अभिनेता राजकुमार राव झाला 'नॅशनल आयकॉन' ! निवडणूक आयोगाने सोपवली 'ही' महत्वाची जबाबदारी - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

अभिनेता राजकुमार राव झाला 'नॅशनल आयकॉन' ! निवडणूक आयोगाने सोपवली 'ही' महत्वाची जबाबदारी

दि. 26.10.2023

MEDIA VNI 

अभिनेता राजकुमार राव झाला 'नॅशनल आयकॉन' ! निवडणूक आयोगाने सोपवली 'ही' महत्वाची जबाबदारी

मीडिया वी.एन.आय : 

मुंबई : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी निवडणूक आयोग अनेक घोषणा करत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने (election commistion) बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar rao) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

अभिनेत्याला नॅशनल आयकॉन बनवण्यात आले आहे. त्याची अधिकृत घोषणा आज, गुरुवारी आयोगाने केली आहे. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे.

नॅशनल आयकॉन म्हणजे काय?
निवडणुकीपूर्वी मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करणे हे राष्ट्रीय आयकॉनचे काम आहे. लोकांना जागरुक करून मतदानाचा टक्का वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राजकुमार राव यांच्या आधी निवडणूक आयोगाने या वर्षी ऑगस्टमध्ये माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला आपला राष्ट्रीय आयकॉन बनवले होते. खरे तर २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणूक आयोगाला अधिकाधिक लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करायचे आहे. यावेळी निवडणूक आयोगाचे लक्ष सर्वाधिक तरुणांवर आहे.

निवडणूक आयोग जेव्हा एखाद्या फिल्मी स्टारला किंवा क्रिकेट सेलिब्रेटीला राष्ट्रीय आयकॉन बनवतो, तेव्हा सेलिब्रिटीसोबत सामंजस्य करार केला जातो. या अंतर्गत, सेलिब्रिटी आपल्याद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करतात.

निर्वाचित केलेल्या आयकॉनला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रचार आणि इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे लागते. जेणेकरून मतदार जागरुक होतील आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान केंद्रांवर पोहचून मतदान करतील. आता त्याच पद्धतीने राज कुमार राव देखील लोकांना जागरूक करताना दिसणार आहेत.


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->