दि. 26.10.2023
MEDIA VNI
महिलांना १० हजार सन्मान निधी, सिलिंडर ५०० रुपयांत; मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची घोषणा.!
मीडिया वी.एन.आय :
जयपूर : काँग्रेसनेही पुन्हा सत्तेत आल्यास कुटुंबातील कर्त्या महिलेला वार्षिक १० हजारांचा सन्मान निधी, तर ५ कोटी कुटुंबांना ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्यात येईल, अशी घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली.
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या जनसभेत गेहलोत बोलत होते. महिलांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या हवेतच घोषणा : प्रियांका गांधी
भाजपप्रणीत केंद्र सरकारने केलेल्या घोषणा केवळ हवेतच जातात. ते केवळ घोषणा करतात, अंमलबजावणीचा मात्र पत्ता नसतो, त्याउलट काँग्रेस सरकारने घोषित केलेल्या योजना प्रत्यक्षात लोकांपर्यंतही पोहोचतात. केंद्र सरकार लोकांसाठी नव्हे, तर ठरावीक उद्योगपतींसाठी काम करते, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली.