इन्स्टाग्रामवरून 'वर्क फ्रॉम होम' शोधलं मिळालेल्या नंबरवर फोन केला अन्... - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

इन्स्टाग्रामवरून 'वर्क फ्रॉम होम' शोधलं मिळालेल्या नंबरवर फोन केला अन्...

दि. 26.10.2023 

MEDIA VNI 

Instagram Job | इन्स्टाग्रामवरून 'वर्क फ्रॉम होम' शोधलं मिळालेल्या नंबरवर फोन केला अन्...

इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या (Instagram Account) अकाउंटवरून 'वर्क फ्रॉम होम'चे आमिष देत एका तरुणीच्या बँक खात्यातून भामट्याने ऑनलाईन 65 हजार रुपये काढून गंडा घातला.

मीडिया वी.एन.आय : 

जालना : इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या (Instagram Account) अकाउंटवरून 'वर्क फ्रॉम होम'चे आमिष देत एका तरुणीच्या बँक खात्यातून भामट्याने ऑनलाईन 65 हजार रुपये काढून गंडा घातला.

ही घटना वणी परिसरातील शास्त्रीनगर येथे सोमवारी उघडकीस आली. आचल अनिल गहूकार (वय 21, रा. शास्त्रीनगर) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे.

आचलचे इन्स्टाग्राम या सोशल प्लॅटफार्मवर अकाउंट आहे. त्यावर ती नेहमी जॉब सर्च करायची. १ जुलै रोजी इन्स्टाग्राम बघत असताना तिच्या अकाउंटवर घर बसल्या नटराज पेन्सिल पॅकिंग जॉब संदर्भात जाहिरात दिसली. त्यावर तरुणीने कामासाठी अप्लाय केला. तरुणीने ऑनलाईन अप्लाय करताच 8535867319 या मोबाईल क्रमांकावरून तिला व्हॉटस्रअॅप कॉल आला.

कॉल करणाऱ्या व्यक्तीने नटराज पेन्सिल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तुमचा आयडी कार्ड उद्या तुम्हाला मिळून जाईल, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी 10 जुलै रोजी तरुणीच्या व्हॉटस्अॅप नंबरवर त्यांनी आयडी कार्डचा फोटो पाठविला. तसेच आयडी कार्ड कुरियरद्वारे पाठविल्याची माहिती दिली. 11 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता तिला 8005416068 या मोबाईल क्रमांकावरून फोन आला.

त्यांनी मी डिलिवरी बॉय बोलत असून, तुमचा आयडी कार्ड रिन्यू करायचा आहे, त्यासाठी 3,500 रुपये फोन पे करण्यास सांगितले. त्याच्या सांगण्यावरून तरुणीने आपल्या भावाच्या मोबाईलवरून 8535867319 या मोबाईलवर 3,500 रुपये फोनेपे द्वारे ट्रान्सफर केले. त्यानंतर त्याच दिवशी वेगवेगळी कारणे देऊन तिला 64,515 रुपये फोनपेवरून पाठविण्यास भाग पाडले.

पैसे पाठवून 3 महिले लोटूनही तरुणीला पार्सल मिळाले नाही. त्यामुळे तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 23 ऑक्टोबर रोजी तरुणीने वणी पोलिसांत याबाबत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी 8535867319 मोबाईल क्रमांक धारकाविरोधात कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला.


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->