दि. 7 ऑक्टोंबर 2023
सातत्यपूर्ण अभ्यासाने यश नक्कीच; प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे
गडचिरोली : स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास व योग्य नियोजन महत्वाचे आहे. विद्यापीठ परीक्षेत्रातील विद्यार्थानी स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढवला पाहिजे. वाचनालयाचा उपयोग करून विद्यार्थांनी उद्दिष्ट साध्य करून असतांना दूरदृष्टीकोण ठेवणे आवश्यक आहे.विद्यार्थांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक असून सातत्यपूर्ण अभ्यासाने यश नक्कीच मिळवता येईल असे प्रतिपादन प्र- कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी केले.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे पुरस्कृत यूपीएससी/एमपीएससी नागरी सेवा स्पर्धा पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत विद्यापीठात प्रशिक्षणार्थीशी संवाद कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे तसेच स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. वैभव मसराम उपस्थित होते. त्यावेळी ते विद्यार्थ्यांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व आभार प्रविण गिरडकर कार्यक्रम समन्वयक यांनी केले.