राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक समस्येचे समाधान म्हणून उभा राहतो; - डॉ. प्रशांत बोकारे - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक समस्येचे समाधान म्हणून उभा राहतो; - डॉ. प्रशांत बोकारे

दि. 7 ऑक्टोंबर 2023
MEDIA VNI 
राष्ट्रीय सेवा योजने चा स्वयंसेवक समस्येचे समाधान म्हणून उभा राहतो; - डॉ. प्रशांत बोकारे 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : बारावी नंतर उच्च शिक्षण घेऊ न शकलेल्या व्यक्तीचे सर्वेक्षण केले जाऊन त्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल. ‘गाव तिथ विद्यापीठ’ या विद्यापीठाकडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाला रासेयो ची  मदत होईल तसेच शिबीर स्थळाची निवड, शिबीर स्थळी केले जाणारे सर्वेक्षण याविषयी मार्गदर्शन केले.रासेयो चा विद्यार्थी हा समाजात समाधान किंवा उपाय म्हणून उभा राहील असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्राचार्य व रासेयो कार्यक्रम अधिकारी संयुक्त वार्षिक नियोजन कार्यशाळा नुकतीच  श्री. शांताराम पोटदुखे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठा  कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख अतिथी  डॉ. एन डी पाटील, प्रमुख वक्ते म्हणून जन आक्रोश संस्थेचे  संस्थापक सचिव रवींद्र कासखेडीकर, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, संचालक रासेयो गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉ. श्याम खंडारे, प्राचार्य जयेश चक्रवर्ती, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, डॉ. विजया गेडाम, डॉ.श्रीराम गहाणे डॉ. उषा खंडाळे, डॉ. कुलदीप आर. गोंड आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या कार्यशाळेत राष्ट्रीय सेवा योजनेत उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विभागीय समन्वयक डॉ. पवन नाईक, उत्कृष्ट स्वयंसेविका जान्हवी पेद्दीवार यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख वक्ते डॉ. एन. डी पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही सामाजिक जाणीव विकसित करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे उत्तम साधन आहे. दुष्काळ, एड्स रोगाबद्दल जनजागृती, 1993 चा  भूकंप, भोपाळ दुर्घटना इत्यादी  संकट काळात राष्ट्रीय सेवा योजना व्दारा केलेल्या कार्याचा आढावा घेऊन कार्यक्रमाधिकाऱ्यासमोर संकट काळात कशाप्रकारे कार्य करावे याची दिशा दाखवून दिली. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी परिस्थितीनुरूप आणि स्थानिक समस्या गृहीत धरून सामाजिक जाणीव, संस्कृती संक्रमण, भाषा संवर्धन, जंगल संवर्धन, जलसंवर्धन, सुट्टीतील शाळा, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी जनजागृती याविषयी नवनवीन उपक्रम कशा प्रकारे राबविता येईल याविषयी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि कार्यक्रम अधिकारी यांना मिळणाऱ्या संधी विषयी मार्गदर्शन केले. 
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी याप्रसंगी विद्यापीठ कार्यक्षेत्रात येणाऱ्या समाजसेवेची इच्छा असणाऱ्या माजी विद्यार्थ्याकरिता ‘एन.एस.एस. ओपन युनिट’ ची संकल्पना मांडली. याप्रसंगी आपल्या विद्यापीठाकडून राष्ट्रीय शिबिराच्या आयोजनाचा आग्रह सन्माननिय कुलगुरू कडे केले.
या कार्यशाळेत मार्गदर्शनाकरिता दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या सत्रातील प्रमुख वक्ते  रवींद्र कासखेडीकर यांनी ‘दुर्घटना मुक्त भारत’ या विषयावर मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अपघाताच्या संदर्भात जनजागरण केल्यास अपघाताचे प्रमाण कमी करता येईल असे प्रतिपादित केले. दुसऱ्या सत्रातील प्रमुख वक्ते डॉ. श्याम खंडारे यांनी ‘विद्यापीठांमध्ये रासेयो अनुदान’ याविषयी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागातील उपक्रम राबवित असताना येणाऱ्या आर्थिक अडचणीवर कशाप्रकारे मात करावी याविषयीचे उपाय सुचविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो चंद्रपूर जिल्हा समन्वयक डॉ. विजया गेडाम यांनी केले. प्रास्ताविक पर भाषणातून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाकडून पूरग्रस्तांना केलेली मदत, कोरोना काळातील कार्याचे कौतुक केले.
उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.कुलदीप गोंड तसेच  आभार डॉ. पुरुषोत्तम माहोरे यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी गोंडवाना विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. श्याम खंडारे, चंद्रपूर जिल्हा समन्वयक डॉ. विजया गेडाम, गडचिरोली जिल्हा समन्वयक डॉ. श्रीराम गहाणे  रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड डॉ.उषा खंडाळे, डॉ.राजकुमार बिरादार, डॉ. वंदना गिरडकर, डॉ. निखील देशमुख यांनी प्रयत्न केले. या कार्यशाळेला गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाधिकारी उपस्थित राहिल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->