दि. 2 नोव्हेंबर 2023
गोंडवाना विद्यापीठाच्या नवनियुक्त स.प्राध्यापकांना युनायटेड किंगडम(UK)कडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्रदान...
- गोंडवाना विद्यापीठाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा.!
- फेडरल रिपब्लिक ऑफ युनायटेड किंगडम(UK) कडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्रदान
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : फेडरल रिपब्लिक ऑफ युनायटेड किंगडम (UK) कडून गोंडवाना विद्यापीठातील संगणक विभागात कार्यरत सहायक प्रा.डॉ. मनीष विलास देशपांडे , डॉ. कृष्णा दीनानाथ कारू, मेघराज माणिकराव जोगी, विकास आत्माराम चित्ते यांना आंतरराष्ट्रीय पेटंट नुकतेच प्रदान करण्यात आले. अविष्काराचे शीर्षक " गॅस सिलेंडरच्या दाबानुसार नवीन सिलेंडरची गरज इंटरनेट ऑफ थिंग्स आधारीत पोर्टेबल डिव्हाइस नुसार ओळखून रिफिलिंग प्रक्रिया अधिक सहज करणे "हा आहे.
गॅस सिलेंडर बुकिंग ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील एक अत्यावश्यक गरज आहे. हीच गरज लक्षात घेऊन वेळेचीसुद्धा बचत करणे हा सदर अविष्काराचा मुख्य हेतू आहे.
★ हे साधन कसे काम करते...
सेन्सर प्रेशर लेव्हलवर काम करताना जेव्हा १४.८ किलो चे वजन असलेले सिलेंडर रिकामे असते तेव्हा सदर यंत्रणा अलार्म ट्रिगर करतो आणि लाल दिवा चमकतो.
जेव्हा सिलेंडर भरले असते म्हणजे वजन २९.० किलो आणि २.५ एटीएम (वातावरणाचा दाब) दाब दर्शवेल तेव्हा सदर यंत्रणा हिरवा दिवा चमकतो.
जेव्हा दाब मध्यभागी असेल तेव्हा सदर यंत्रणा संदेशासह पिवळा दिवा चमकतो.
★ या साधनाची उपयुक्तता काय...
लवकर तपासणी करून सिलेंडर पुन्हा भरण्यासाठी त्वरीत तरतूद करू शकतो.
हे पोर्टेबल आहे, कोणीही वजनदार सिलेंडर सहज हलवू शकतो.
जेव्हा सिलिंडरचे वजन किमान उंबरठ्यावर पोहोचते तेव्हा ते
अलार्म सिस्टम पाठवून वापरकर्त्याला अलर्ट करते.
ही यंत्रणा सिलेंडरचे वजन सतत मोजते.
सोयीसाठी वेगवेगळे दिवेही देण्यात आले आहेत
अत्याधुनिक प्रणालीचा मोठा फायदा हा आहे की ती द्रुत प्रतिसाद आणि अचूक शोध आणि नियंत्रण प्रदान करते आणि अशा प्रकारे गंभीर परिस्थितीला योग्य हाताळण्यात मदत करते.
सद्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात सदर साधनाची उपयुक्तता ही महत्वपूर्ण आहे.
या उपयोगी संशोधानाकरिता गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.अनिल चिताडे, मानवविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.चन्द्रमौली यांनी संशोधनकर्त्यांचे विशेष कौतुक केले आहे.