दि. 9.11.2023
MEDIA VNI
जगातील सर्वात महाग कोंबडा; 'लॅम्बोर्गिनी चिकन'ची किंमत जाणून व्हाल चकित .!
मीडिया वी.एन.आय :
जगातील सर्वात महाग कोंबडा 'अयाम सेमानी' आहे. हा कोंबडा इंडोनेशियाच्या जावामध्ये आढळतो. सध्याच्या चलन दरानुसार एका कोंबड्याची किंमत $2,500 म्हणजेच 2 लाख 8 हजार 218 रुपये आहे.
A-z-animals च्या अहवालानुसार, फायब्रोमेलॅनोसिसमुळे आयम सेमानी चिकनमध्ये डार्क पिगमेंट तयार होतं. ही एक दुर्मिळ स्थिती आहे, ज्यामुळे या कोंबड्याचे मांस, पिसे आणि अगदी हाडे पूर्णपणे काळी दिसतात. त्यामुळे याला 'लॅम्बोर्गिनी चिकन' असंही म्हणतात. ह्या कोंबड्या धान्यं मोठ्या उत्साहाने खातात. ही कोंबडी खूप वेगाने वाढते, म्हणून त्यांना इतर कोंबडीच्या जातींपेक्षा जास्त प्रथिनेयुक्त आहार आवश्यक असतो.
ही कोंबडी खायला खूप चविष्ट आणि फायदेशीर आहे, हे चिकन खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. त्यासाठी ही कोंबडी प्रसिद्धही आहे. आयम सेमानी कोंबडीचे मांस इतर कोंबडीच्या जातींच्या तुलनेत प्रथिने आणि कमी चरबीयुक्त म्हणून ओळखले जाते. ज्यांना प्रथिनांचे सेवन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. याशिवाय त्याची अंडी अनेक प्रकारचे आरोग्य लाभ देणारी मानली जातात.
A-z-animals च्या अहवालात अयम सेमानी नंतर विकल्या गेलेल्या इतर महागड्या कोंबड्यांबद्दल देखील सांगितलं आहे. जे खालीलप्रमाणे आहेत - डोंग ताओ ($2,000), डेथलेयर ($250), लीज फायटर ($150), ऑरस्ट ($100), ओलांडस्क ड्वार्फ ($100), स्वीडिश ब्लॅक ($100), पावलोव्स्काया ($86), सेरामा ($70), ब्रेसे ($30) आणि ब्रह्मा ($25). कोंबडीच्या नावासह कंसात लिहिलेली किंमत प्रति कोंबडी आहे.
¿Os gusta el pollo?
— GualterMatao🔻 (@Auroraiterum) November 2, 2023
El Ayam Cemani es un pollo totalmente negro y su sabor es, por lo que dicen, espectacular.
¿Pagaríais 2000€ por comeros uno?😋😋 pic.twitter.com/3Bq2qZNye2