प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टीची घोषणा, रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टीची घोषणा, रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण.!

दि. 19.01.2024

MEDIA VNI 

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टीची घोषणा, रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण.!

Holiday Declared in Maharashtra on 22nd, January 2024 : Holiday in Maharashtra 22nd January:

मीडिया वी.एन.आय: 

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरदार सुरू आहे. 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. 

या दिवशी महाराष्ट्रात सुट्टी जाहीर करण्याची मागणी करणात आली होती. आता याबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली.

राज्य सरकारने एक पत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे रामभक्तांना आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण रामभक्तांसाठी 22 जानेवारी 2024 हा दिवस खूप खास दिवस असणार आहे. दुपारी 12.20 वाजता प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जगभरातील रामभक्त आतुर झाले आहेत. या दिवसासाठी देशभरातील मंदिरांमध्ये सुद्धा विशेष तयारी करण्यात येत आहे.

याआधी केंद्र सरकारनेही 22 जानेवारी रोजी केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांना अर्ध्या दिवसानंतर सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी (18 जानेवारी 2024) केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जनतेच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टने 22 जानेवारी रोजी मोजक्याच पाहुण्यांना सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे. मात्र, असे असले तरी देशभरातील विविध राज्य सराकर आणि रामभक्तांनी ठिकठिकाणी वेगवेगळी तयारी केली आहे. अनेक ठिकाणी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळा लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. तर कुठे राम मंदिरात भव्य सोहळ्यांचे आयोजन कऱण्यात आले आहे.

उत्तरप्रदेशात सार्वजनिक सुट्टी जाहीर (Holiday announce in Uttar Pradesh)
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी सर्व शैक्षणिक संस्था आणि सरकारी कार्यालये, इतर आस्थापना बंद राहणार आहेत.

अयोध्येत दीपोत्सव (Deepotsav in Ayodhya saryu river)
अयोध्येतील शरयू घाटाच्या तिरावर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील प्रत्येक घाट आणि मंदिरात दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

कुठे ड्राय डे जाहीर (Dry Day announce)
नोएडा, ग्रेटर नोएडा, अयोध्येसह उत्तरप्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील सर्व दारूची दुकाने बंद राहणार आहेत.

पुण्यात मांसविक्री बंद राहणार
22 जानेवारी रोजी पुण्यात मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Announcement of public holiday in Maharashtra on January 22 on the occasion of Pran Pratishtha ceremony, happy atmosphere among Ram devotees.!



Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->