इंदिरानगर क्रिकेट क्लब गडचिरोली यांच्या सौजन्याने भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांचे हस्ते संपन्न.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

इंदिरानगर क्रिकेट क्लब गडचिरोली यांच्या सौजन्याने भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांचे हस्ते संपन्न.!

दि.19.01.2024 
MEDIA VNI 
इंदिरानगर क्रिकेट क्लब गडचिरोली यांच्या सौजन्याने भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांचे हस्ते संपन्न.!
- खासदार अशोक नेते यांनी स्वतः खेळाडूंचे नमो चषक 2024 चे नोंदणी फार्म भरून घेतले.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : आज दिनांक १९ जानेवारी २०२४ रोज शुक्रवार ला इंदिरानगर क्रिकेट क्लब गडचिरोली यांच्या सौजन्याने भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धा गोटूल भूमी चांदाळा रोड,इंदिरानगर गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले.
या क्रिकेट स्पर्धेच्या सर्वप्रथम सुरूवातीला स्वच्छ मंदिर अभियान अंतर्गत खासदार अशोक नेते यांनी हाती झाडू घेऊन गोटूल भूमी या मंदिर गाभाऱ्यातील परिसरातील केरकचरा, साफसफाई करून स्वच्छ करण्यात आले.
या नंतर या भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांनी फित कापून केले.
यावेळी दोन्ही संघाचा टॉस झाल्यावर दोन्ही संघांना हस्तांदोलन करून शुभेच्छा देत  खासदार अशोक नेते यांनी हातात बॅट घेऊन खेळण्याचा आनंद घेण्यासाठी  उत्सुकतेने मैदानात उतरून खेळ खेळला.
याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी खेळाडूंविषयी आपल्या भावना व्यक्त करतांना या वर्षी अनेक युवक वर्ग उत्साहाने प्रोत्साहित होऊन नमो चषक -2024  टूर्नामेंट सहभागी होऊन खेळ खेळल्या जात आहे.याकरिता खासदार अशोक नेते यांनी स्वतः नमो चषक 2024 चे नोंदणी फार्म दोन्ही संघाच्या  खेळाडूंचे नोंदणी फार्म केले.
भारतीय जनता पार्टी तर्फे नमो चषक 2024 चा नोंदणी फार्म सदस्यता अभियान सुरवात करण्यात आले असून युवा मोर्चा च्या प्रत्येक कार्याचे सक्तीने साथ देऊन सदैव युवा मोर्चा च्या पाठीशी आहे असे सांगून जास्तीत जास्त नमो चषक 2024 साठी सदस्यांनी नोंदणी करून यांच लाभ घ्यावे.
आपणही सर्व खेळाडूंनी नोंदणी फार्म भरून नमो चषक, नमो अप डाऊनलोड करून घ्यावा. अशा सूचना यावेळी खेळाडूंना दिल्या.
यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर,युवा मोर्चाचे सचिव हर्षल गेडाम,युवा मोर्चाचे महामंत्री मंगेश रणदिवे,गणवीर साहेब, सुजित मेश्राम, संदिप वासेकर, जगदिश गडपायले,राहुल चूनचूनवार,शाहरुख पठाण,छोटु पठाण,आनिल नैताम तसेच मोठ्या संख्येने युवा खेळाडू उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->