Allahabad High Court : नोकरी नसेल तर मजूरी करा पण पत्नीला भत्ता द्या; उच्च न्यायालयाचा आदेश.!
Allahabad High Court: प्रयागराज Prayagraj
मीडिया वी.एन.आय :
उत्तर प्रदेश/अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाने देखभाल भत्त्याशी संबंधित एका प्रकरणात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. पतीला नोकरीतून कोणतेही उत्पन्न नसले तरी तो पत्नीला भत्ता देण्यास बांधील आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
अकुशल कामगार म्हणून तो दररोज सुमारे 300-400 रुपये कमवू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.
उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाच्या न्यायमूर्ती रेणू अग्रवाल यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पुरुषाची पुनर्विचार याचिका फेटाळताना ही टिप्पणी केली आहे. कौटुंबिक न्यायालयाने याचिका करणाऱ्या पतीला आदेश दिले होते की त्याने त्याच्या पत्नीला २ हजार रुपये मासिकव भत्ता द्यावा. मात्र पतीने 21 फेब्रुवारी 2023 रोजी अहलाबाद उच्च न्यायालयात कौटुंबिक न्यायालय क्रमांक 2 च्या आदेशाला आव्हान देत पुनरीक्षण याचिका दाखल केली होती. यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी घेत नवीन आदेश दिले आहेत. (Allahabad high court News in Marathi)
याचिकाकर्त्याची 2015 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर पत्नीने हुंड्याचा आरोप करत पती आणि सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर ती वेगळी राहू लागली. २०१६ मध्ये पत्नी तिच्या आई-वडिलांसोबत राहू लागली. या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने पतीला देखभाल भत्ता देण्यास सांगितले होते. यानंतर पतीने अलाहाबाद हायकोर्टात जाऊन सांगितले की, त्याची पत्नी पदवीधर आहे आणि शिकवणीतून दरमहा 10,000 रुपये कमावते. मात्र मुख्य न्यायमूर्तींनी हे विचारात घेतले नाही.
सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने सांगितले की, पत्नी शिकवून दरमहा 10,000 रुपये कमावते हे सिद्ध करण्यासाठी पती कोणतेही कागदपत्र सादर करू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याचे आई-वडील आणि बहिणी त्याच्यावर अवलंबून आहेत आणि तो शेती करून काहीतरी कमावतो, हा त्याचा युक्तिवादही न्यायालयाने विचारात घेतला नाही.
पती एक निरोगी व्यक्ती आहे आणि पैसे कमविण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, असे न्यायालयाने नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तो पत्नीला भरणपोषण देण्यास बांधील आहे. जर त्याने स्वत:ला मजुरीच्या कामात गुंतवले तर तो अकुशल कामगार म्हणून किमान वेतनातून दररोज सुमारे 300-400 रुपये कमवू शकतो. (Latest Marathi News)
Allahabad High Court : If not employed, do wages but give allowance to wife; Order of the High Court.!