Maharashtra : नागरिकांना जनावरांसारखी वागणूक देऊ नका; कौसा-मुंब्रा रुग्णालयात मोफत उपचार देण्याचे आदेश.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Maharashtra : नागरिकांना जनावरांसारखी वागणूक देऊ नका; कौसा-मुंब्रा रुग्णालयात मोफत उपचार देण्याचे आदेश.!

दि. 30.01.2024

MEDIA VNI 

Maharashtra : नागरिकांना जनावरांसारखी वागणूक देऊ नका; कौसा-मुंब्रा रुग्णालयात मोफत उपचार देण्याचे आदेश.!

मीडिया वी.एन.आय : 

महाराष्ट्र/ ठाणे : देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. या अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. ही जबाबदारी पार पाडणे म्हणजे नागरिकांना जनावरांसारखी वागणूक देणे असा त्याचा अर्थ होत नाही, असे उच्च न्यायालयाने मिंधे सरकारचे कान उपटले.

जगण्याचा अधिकार म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार, असा त्याचा अर्थ होतो. हा अधिकार शाबूत ठेवताना नागरिकांना परवडणारे वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. नागरिकांना परवडणारे उपचार मिळत नसतील तर जगण्याच्या अधिकाराची व्याख्या पूर्ण होत नाही. ती केवळ तडजोड असते, असे न्यायालयाने फटकारले व संविधानातील तरतुदीची आठवण करून दिली.

मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. कौसा-मुंब्रा येथील रुग्णालयात नागरिकांना नियमानुसार मोफत व परवडणारे उपचार द्यावेत, असे आदेश न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेला दिले आहेत.

दहा कोटींचा खर्च पोहोचला 139 कोटींवर
कौसा-मुंब्रा येथे 100 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय 2008मध्ये घेण्यात आला. त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर 15 वर्षे झाली तरी अजून हे रुग्णालय सुरू झालेले नाही. धक्कायदायक बाब म्हणजे 2014मध्ये याची प्रत्यक्ष वर्क ऑर्डर निघाली. ही वर्क ऑर्डर 139.04 कोटींची होती. रुग्णालयाचे बांधकाम झाले. पण रुग्णालय सुरू झाले नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

काय आहे प्रकरण…
असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स व अन्य यांनी ही जनहित याचिका केली होती. कौसा-मुंब्रातील नागरिकांची सामाजिक, आर्थिक व आरोग्य स्थितीचा अहवाल टाटा संस्थेने सादर केला. येथील नागरिकांना पुरेशी वैद्यकीय सेवा देण्याची सूचना करण्यात आली. येथील नागरिकांना पुरेशी आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी ठाणे पालिकेची आहे. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोफत उपचार दिले जातात. त्यानुसार या रुग्णालयातही नागरिकांना मोफत उपचार द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

Maharashtra : Don't treat citizens like animals; Order to provide free treatment at Kausa-Mumbra Hospital.!

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->