BJP भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर.! - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

BJP भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर.!

दि. 06 मार्च 2024
MEDIA VNI 
BJP भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर.! 
मीडिया वी.एन.आय :
मुबंई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवसापूर्वी भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. यामुळे भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची संभाव्य यादी समोर अशातच भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे. 

भाजपच्या संभाव्य 32 लोकसभा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे.. 👇

पुणे : मुरलीधर मोहोळ
धुळे : सुभाष भांबरे यांच्याऐवजी प्रदीप दिघावकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता.
हिंगोली : हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजपा आग्रही असून त्याठिकाणी भाजपच्या तानाजी मुरकुटे यांना संधी मिळण्याची शक्यता.
जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता.
चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवले जाण्याची शक्यता.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार.
नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.
अकोला : संजय धोत्रे
ईशान्य मुंबई : मनोज कोटक
सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्याऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता.
कोल्हापूर : सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे.
भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे
बीड : विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे
माढा – रणजितसिंह निंबाळकर

गडचिरोली : अशोक नेते यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपच्या चिन्हावर लढू शकतात.
भिवंडी : कपिल पाटील
सांगली : संजयकाका पाटील यांच्याऐवजी काँग्रसचे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकतो.
सातारा : उदयनराजे भोसले
जळगाव : उन्मेष पाटील किंवा ए टी नाना पाटील.
दिंडोरी : भारती पवार
रावेर : अमोल जावळे
उस्मानाबाद : बसवराज पाटील (नुकताच बसवराज पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केलाय)
उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता.
संभाजीनगर : विद्यामन मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड.
उत्तर मध्य मुंबई : पुनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता.
ठाणे : डॉ.संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. (ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. मात्र, भाजपा घेण्यास आग्रही आहे )
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे.( रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अजूनही वाद सुरु आहे. शिंदे गटाकडून किरण सामंत लढण्यास इच्छुक आहेत )
दक्षिण मुंबई : राहूल नार्वेकर
नांदेड : मिनल खतगावकर (अशोक चव्हाण यांची भाची.आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतलेली )
राजेंद्र गावीत : सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत. मात्र, ते भाजपा पक्षप्रवेश करून भाजपा तिकीटावर लढतील अशी शक्यता आहे.
अहमदनगर : सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे.सध्या नगरमध्ये वाद सुरू आहे.
अमरावती : नवनीत राणा यांचा भाजपा पक्षप्रवेश होईल. मात्र, नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत. या जागेवर आनंदराव अडसूळ हेदेखील आग्रही आहेत.
BJP's probable list of Lok Sabha candidates in Maharashtra announced!

Share News

copylock

Post Top Advertisement

-->