लाँजमध्ये घुसला बिबट्या; चिमुकल्याने काय केलं एकदा Video पाहाच.. - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

लाँजमध्ये घुसला बिबट्या; चिमुकल्याने काय केलं एकदा Video पाहाच..

दि. 06 मार्च 2024

MEDIA VNI 

लाँजमध्ये घुसला बिबट्या; चिमुकल्याने काय केलं एकदा Video पाहाच..

मीडिया वी.एन.आय : 

नाशिक : वाघ, सिंह, बिबट्या म्हणताच भल्याभल्यांना घाम फुटतो. यापैकी एखादा प्राणी अचानक तुमच्या समोर आला तर तुम्ही काय कराल? कल्पना करूनच भल्याभल्यांना धडकी भरली असेल. पण नाशिकमधील एका चिमुकल्याने या परिस्थितीत जे केलं ते पाहून अनेकांनी त्याच्या हिमतीला दाद दिली आहे.

मालेगाव शहरातील नामपूर रोडवरील एका बंद असलेल्या लॉन्स मध्ये बिबट्या घुसला. तेव्हा तिथं एक शाळकरी मुलगा होता. मुलाने बिबट्याला पाहिलं पण बिबट्याने मुलाला नाही. त्याच संधीचा फायदा घेत मुलाने धाडस दाखवलं आणि आपला जीव वाचवला.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मुलगा सोफ्यावर बसला आहे. त्याच्या हातात मोबाईल आहे. तो मोबाईलमध्ये व्यस्त आहे. तितक्यात बाहेरून आत एक बिबट्या घुसतो. बिबट्या मुलाच्या अगदी जवळ आहे, पण मुलाचं नशीब चांगलं म्हणून बिबट्याची नजर त्याच्यावर पडली नाही. तो तसाच आत शिरला. तसा तो मुलगा गुपचूप आपल्या जागेवरून उठला. तिथून बाहेर पडला आणि दरवाजा बंद करून त्याने बिबट्याला आत कोंडून ठेवलं.

मोहित आहिरे असं या मुलाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बिबट्याला रेस्क्यु करण्यासाठी वनविभाग, पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. असुन बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

पुण्यातील प्राणीसंग्रहालयातून पळाला बिबट्या

राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून सोमवारी सकाळी एक बिबट्या पळून गेला. या प्राणीसंग्रहालयात एकूण चार बिबटे आहेत, त्यातील तीन बिबटे या मादा आहेत तर एक बिबट्या नर आहे. हा नर बिबट्याच पिंजऱ्यातून पळून गेला आहे.

प्राण्यांची आदलाबदल उपक्रमांतर्गत हा बिबट्या तीन महिन्यांपूर्वी कर्नाटकातील हंपीवरून राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात आणण्यात आला होता. त्याचं वय अंदाजे आठ वर्ष इतकं आहे. त्याला प्राण्यांच्या विलगीकरण विभागात ठेवण्यात आलं होतं. मात्र तिथून तो पिंजऱ्यातून पळून गेला.

हा बिबट्या सध्यातरी याच प्राणी संग्रहालयाच्या जंगलात फिरत आहे. हा बिबट्या या परिसरात मुक्तसंचार करत असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे.

130 एकरचा हा परिसर असल्यानं पिंजऱ्यामधून पळून गेलेल्या बिबट्याला पुन्हा पकडण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर निर्माण झालं आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी तीन रेस्क्यू पथकं तयार करण्यात आली आहेत. त्याला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. जोपर्यंत बिबट्या पकडला जात नाही, तोपर्यंत प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहे.




Share News

copylock

Post Top Advertisement

-->