दि. 21 मार्च 2024
रंगोत्सवात चमकली विसोरा येथील जिल्हा परिषद कन्या शाळा.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे दिनांक 18 मार्च ते 19 मार्च 2024 दरम्यान झालेल्या रंगोत्सव कार्यक्रमात 2024 मध्ये जिल्हा परिषद कन्या शाळा विसोराचे एकूण आठ विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उत्कृष्ठ सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली. गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल भागातून आपल्या विद्यार्थ्यांची उत्तम तयारी करून रंगोत्सवामध्ये गडचिरोलीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या संघाची निवड करण्यात आली. स्पर्धेत सहायक शिक्षिका अर्चना सांगोळकर, सहायक शिक्षक प्रवीण मुजमकर यांनी स्वरा फाये,मोनाली नाकाडे, आराध्या वघारे, माही मेश्राम, माही सुंदरकर, आराध्या वझाडे, परिधी अवसरे, अभिज्ञा या विद्यार्थ्यांना घेऊन scert पुणे येथे रंगोत्सव स्पर्धेत सहभागी झाले होते. यासाठी मुख्याध्यापक धनपाल मिसार, मुख्याध्यापिका आळे, केंद्रप्रमुख एकनाथ पीलारे, सहायक शिक्षिका डोंगरे, निशा पर्शुरामकर, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कोकुडे, संपुर्ण गटसाधन देसाईगंज टीम, डाएट गडचिरोली यांचे मार्गदर्शन लाभले.