स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगावे लागेल ; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगावे लागेल ; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल.!

दि. 4 एप्रिल 2024 

MEDIA VNI 

स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगावे लागेल ; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल.!

मीडिया वी.एन.आय 

प्रतिनिधी/गडचिरोली : देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क व जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी लोकशाही पुरस्कृत संविधान लिहून देशाला उत्तम घटना दिली. माञ सध्याच्या केंद्रातील मनुस्मृति विचारांचे सरकारने देशांतील नागरिकांची लूट करुन, धर्मांधतेच्या नावावर दिशाभूल करीत व्यापारी हित जोपासून देशाच्या नागरिकांचे रक्षण कवच असलेल्या पवित्र संविधान पूर्णतः बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम म्हणून जगावे लागेल, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारासाठी चामोर्शी येथे आयोजीत सभेत बोलत होते.

आजच्या प्रचार सभेस प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार, आमदार सुनील भुसारा, रायुकॉ प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे,इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ नामदेव किरसान, गडचिरोली काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, ॲड. राम मेश्राम, गडचिरोली रा. कॉ. जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवर, चंद्रपूर रा कॉ. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, काँग्रेस महीला आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. कविता मोहरकर, संजय ठाकरे, लोमेश बुरांडे, राजू आत्राम, विजय गोरडवार, कबिरदास आभारे, अशोक तिवारी, सुरेश नैताम प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

सभेत बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशांतील शेतकरी, कामगार, युवक नोकरदार वर्ग व सर्व नागरीक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण यामुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असून आता विरोधकांना संपविण्याचा डाव आखला जात आहे. खते, जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, गॅस यात प्रचंड दरवाढ व जीएसटी च्या माध्यमातून जनतेची लूट केली जात आहे. अश्या निष्ठूर सरकार विरुद्ध आता पेटून उठून देशातील संविधान टिकविण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. देश सुरक्षित नाही, देशांतील महीला सुरक्षित नाही, महीला खेळाडूंचे शोषण करणारे मोकाट फिरत आहे. अशी अवस्था देशाची झाली आहे.तर विद्यमान खासदार अशोक नेते हे संसदेत मौन धारण करून बसतात अश्या मौनी बाबाला उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार देतात ही हास्यास्पद बाब असल्याची टीका विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली. तर देशातील भाजप सरकार हे आदिवासी, शेतकरी, कामगार, युवक विरोधी सरकार असून देशाच्या शेतकऱ्यांना आजवर हमीभाव दिला नाही. पेपर फुटीमुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. माञ सरकार कारवाईकडे पाठ फिरवीत आहे. देशांत तानाशाही सुरु असून पक्ष आणि कुटुंब फोडले जात असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली. त्यामुळेच सत्ताबदल करण्यासाठी ताकदीने एकत्र लढले पाहिजे असा निर्धार आज या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने केला.


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->