Gadchiroli : नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये शांततेत निवडणुकीसाठी पोलीस सज्ज.! - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

Gadchiroli : नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये शांततेत निवडणुकीसाठी पोलीस सज्ज.!

दि. 4 एप्रिल 2024 

MEDIA VNI 

Gadchiroli : नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये शांततेत निवडणुकीसाठी पोलीस सज्ज.! Gadchiroli Police : Lok Sabha Election 

मीडिया वी.एन.आय : 

प्रतिनिधी/गडचिरोली : देशातील अतिसंवेदनशील, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून नक्षलविरोधी कारवायासंबंधात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत.

त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील निवडणूक निर्धोक पार पडावी, यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वात पोलिस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ७४ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी २२ मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन निवडणुकीसंदर्भातील पोलिस दलाच्या तयारीचा आढावा घेतला.

यावेळी त्यांच्यासोबत अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) प्रवीण साळुंके, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल उपस्थित होते. या बैठकीत रश्‍मी शुक्ला यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या घटनाबाह्य कृतींना आळा बसावा, यासाठी योग्य व्यूहरचना आखण्याबाबत मार्गदर्शन केले.

संवेदनशील ठिकाणी हवाई रुग्णवाहिका

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात तब्बल ४२८ मतदान केंद्रे संवेदनशील व अतिसंवेदनशील असल्याने लोकसभा निवडणुकीदरम्यान हवाई रुग्णवाहिकेची सेवा घेण्यात येणार आहे. याला गृह विभागाने मंजुरी दिली आहे. नक्षलवाद्यांकडून घातपात होण्याची शक्यता लक्षात घेत ही व्यवस्था केली आहे. ही हवाई रुग्णवाहिका मतदानाच्या दोन दिवस आधी येणार आहे. मतदानानंतर दोन दिवस म्हणजेच १७ ते २१ एप्रिल ही रुग्णवाहिका येथे राहणार आहे. निवडणुकीदरम्यान अधिकारी, कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडल्यास हवाई रुग्णवाहिकेमुळे त्यांना तातडीने उपचारासाठी हलविणे सोपे होणार आहे.

गेल्या महिन्यातील कारवाया

१९ मार्च : जिल्ह्यातील कोलामर्का पहाडी परिसरात झालेल्या भीषण चकमकीत चार जहाल नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. घटनास्थळावरून पोलिसांनी शस्त्रे, स्फोटके व साहित्य जप्त केले. व्हर्गिस (छत्तीसगड), पोडियम पांडू ऊर्फ मंगुलू (छत्तीसगड), कुरसंग राजू, कुडीमेट्टा व्यंकटेश हे नक्षलवादी यात ठार झाले. त्यांच्यावर राज्य सरकारचे ३६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

२१ मार्च : कट्टर नक्षलवादी पेका मादी पुंगाटी याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सरकारने दीड लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

२७ मार्च : गडचिरोली जिल्हा आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत पोलिस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. घनदाट जंगलाचा फायदा घेऊन नक्षलवाद्यांनी पलायन केले. पोलिसांनी नक्षलवादी साहित्य, वायर, जिलेटीनच्या कांड्या, बॅटरी, सौर पॅनेल आदी साहित्य जप्त केले.

२९ मार्च : गडचिरोली पोलिसांनी वेगवान कारवाई करत गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील चुटीनटोला गावाजवळील नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला.

२९ मार्च : पोलिसांचा खबऱ्या असल्याचे सांगत नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्यातील दामरंचा गावातील अशोक तलांडे या ग्रामस्थाची निर्घृण हत्या केली. त्याचा मृतदेह महामार्गावर टाकून तिथे पत्रकसुद्धा टाकले.


Share News

copylock

Post Top Advertisement

-->