दि. 25 एप्रिल 2024
MEDIA VNI
गडचिरोली : हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी ठार परिसरात दहशत.!
मीडिया वी.एन.आय :
प्रतिनिधी/गडचिरोली : तेलंगणा राज्यात दोन जणांचा बळी घेऊन गडचिरोली जिल्ह्यात परतणाऱ्या हत्तीने आज (दि.25) भामरागड तालुक्यातील कियर येथील शेतकऱ्यास ठार केले. गोंगलू रामा तेलामी (वय ३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
दि. ३ एप्रिलला हत्ती मुलचेरा तालुक्यातील प्राणहिता नदी ओलांडून तेलंगणा राज्यात गेला होता. तेथील कुमुरमभीम जिल्ह्यातील बुरेपल्ली येथील दोन शेतकऱ्यांना हत्तीने तुडवून ठार केले. त्यानंतर हा हत्ती ६ एप्रिलला पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात आला.
सिरोंचा वनविभागातील बल्लाळम जंगलात बरेच दिवस मुक्काम ठोकल्यानंतर हत्तीने दि. २३ एप्रिलला अहेरी तालुक्यात प्रवेश करुन चिरेपल्ली येथील एका किराणा दुकान आणि धान्याची नासधूस केली. त्यानंतर हत्तीने भामरागड वनपरिक्षेत्रात आज दुपारी ४ च्या सुमारस कियर येथील शेतकरी गोंगलू तेलामी शेतात काम करताना हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
Gadchiroli: Farmer killed in elephant attack, panic in the area!