दि. 25 एप्रिल 2024
MEDIA VNI
गडचिरोली नक्षलग्रस्त की मलेरिया मच्छरग्रस्त.?
मीडिया वी.एन.आय :
प्रतिनिधी/गडचिरोली : नक्षल कारवायांमुळे चर्चेत असलेला गडचिरोली जिल्हा आता मच्छरग्रस्त म्हणूनही ओळखला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी तब्बल ३६ टक्के रुग्ण एकट्या गडचिरोलीत असल्याने हा जिल्हा मलेरियाच्या बाबतीत हॉटस्पॉट असल्याची माहिती उजेडात आली आहे.
मलेरियामुळे मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील ३७ जणांनी आपले प्राण गमावले असून, गडचिरोलीतील 'दक्षिण' क्षेत्राला डासांनी अधिक टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ७८ टक्के जंगलक्षेत्र असल्याने येथे डासांसाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
पाच वर्षांतील राज्यातील मलेरिया रुग्णांची नोंद
वर्ष रुग्ण नोंद मृत्यू
२०१९ ८,८६६ ७
२०२० १२,९०९ १२
२०२१ १९,३०३ १४
२०२२ १५,४५१ २६
२०२३ १,६१५९ १९
१६,१५९ मलेरिया रुग्ण २०२३ मध्ये राज्यात आढळले होते. तर ५,८६६ मलेरिया रुग्ण एकट्या गडचिरोलीतील आढळले.
कारणे काय?
■ वनक्षेत्र अधिक असल्याने डासांचा प्रादुर्भाव अधिक आहे; पण प्रतिबंधासाठी आदिवासी पाडे, वस्त्यांपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचत नाही.
■ अज्ञान, अनेक जण स्थानिक पुजाऱ्यांकडे जातात. यामुळे मृत्यूचा धोका वाढतो.
राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या गडचिरोली जिल्ह्यात असल्याने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. ज्या आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील गावांमध्ये अधिक प्रादुर्भाव आहे, तेथे घरोघर जाऊन सर्व लोकांचे रक्तनमुने घेऊन निदान केले जाईल.
- डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे
Gadchiroli naxal infected or malaria mosquito infected.?