उष्माघात प्रतिबंधासाठी 'वाटर बेल' संकल्पना राबवा : CEO आयुषी सिंह - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

उष्माघात प्रतिबंधासाठी 'वाटर बेल' संकल्पना राबवा : CEO आयुषी सिंह

दि.09.05.2024
MEDIA VNI 
उष्माघात प्रतिबंधासाठी 'वाटर बेल' संकल्पना राबवा : CEO आयुषी सिंह
- दर तासाला १ ग्लास पाणी प्या.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : जिल्ह्यात उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा आणि त्यामुळे उद्भ वणा-या उष्माघातजन्य आणि तद्अनुषंगिक आजारांचा सामना करावा लागत असून उष्माघात प्रतिबंधासाठी 'वाटर बेल' (Water Bell) संकल्पनेचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.
उष्णतेच्या लाटेमध्ये प्रामुख्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण उत्तम ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दररोज सरासरी किमान ४ ते ५ लिटर इतके पाणी पिणे आवश्यक आहे. लहान मुले, आजारी व्यक्ती यांनी देखील मुबलक प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.
शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थी, शेतकरी व इतरांना ब-याचदा व्यस्त कामकाजामुळे तहान लागली असली तरी देखील पाणी पिण्याचा विसर पडतांना आढळून येते. 
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास व बराच वेळ उष्णतेच्या संपर्कात राहिल्यास उष्माघाताचे विविध आजार होउन गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.  प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना तात्काळ न केल्यास प्रसंगी मृत्यू देखील ओढवू शकतो.
या सर्वांवरील सोपा उपाय म्हणजे दर तासाला किमान १ ग्लास (१०० ते १५० मिली) एवढे शुद्ध पाणी पिणे व त्याचा सातत्य राखणे होय, जेणेकरुन शरीरात जलशुष्कतेची परिस्थीती उद्भवणार नाही.
आपले आरोग्याबाबत सर्वांनी सजग राहणे गरजेचे असून आपले कार्यालय, आपले अधिनस्त येणा-या सर्व शासकीय संस्था तसेच याव्यतिरिक्त इतर शासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, आपले कार्यक्षेत्रात येणारी सर्व कार्यालये, सर्व  अंगणवाडी, सर्व शाळा या ठिकाणी दर १ तासाला बेल वाजवुन किंवा सार्वजनिक पुकारणा करुन पाणी पिण्याबाबत सुचित करावे, अशा सूचना श्रीमती आयुषी सिंह यांनी दिल्या असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->