Gadchiroli : घातपात घडवण्यासाठी नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेली आयईडी स्फोटक पोलिसांनी केली नष्ट.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Gadchiroli : घातपात घडवण्यासाठी नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेली आयईडी स्फोटक पोलिसांनी केली नष्ट.!

दि. 06.05.2024

MEDIA VNI 

Gadchiroli : घातपात घडवण्यासाठी नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेली आयईडी स्फोटक पोलिसांनी केली नष्ट.!

मीडिया वी.एन.आय :

प्रतिनिधी/गडचिरोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवून आणण्यासाठी नक्षल्यांनी जमिनीत ६ कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी आणि ३ क्लेमोर स्फोटके गडचिरोली पोलिसांनी नष्ट केली. नक्षलग्रस्त टिपागड टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली. लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. निवडणुकीदरम्यान नक्षल्यांकडून होणाऱ्या हिंसक कारवाया लक्षात घेऊन यावेळी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. त्यामुळे मोठा घातपात घडविण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी टिपागड परिसरात मोठ्या प्रमाणात पुरून ठेवललेली स्फोटके तशीच होती. दरम्यान, आज सोमवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलाविरोधी पथक सी ६०, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद कृती पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला टिपागड परिसरात शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी जवानांना स्फ़ोटकांनी भरलेले ६ प्रेशर कुकर, ३ क्लेमोर पाईप, गन पावडर, औषधे व इतर साहित्य आढळून आले. बॉम्ब शोधक पथकाने ९ आयईडी व ३ क्लेमोर घटनास्थळीच नष्ट केले. सर्व टीम जवळच्या पोलीस ठाण्यात आल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->