दि. 05.05.2024
MEDIA VNI
देश प्रगतीकडे चालला पण असंख्य कुटुंब उघड्यावरच; 'अच्छे दिनपासून अजूनही वंचित'.!
मीडिया वी.एन.आय :
प्रतिनिधी : देश प्रगतीकडे चालला आहे, असं म्हणतात, त्यात तथ्यही असेल, मात्र आजही असंख्य कुटुंबे खाली धरती आणि वर आकाश अशा प्रकारचा आसरा घेत दिवसभर काबाडकष्ट करीत रात्री उघड्यावरच झोपतात.
त्यांना अजूनही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. सातपुड्यातल्या अनेक वाड्या-पाड्यांवर असंख्य कुटुंबे आजही सकाळी पाच वाजता डबा घेऊन गाडीत बसतात आणि सायंकाळी मोलमजुरी करून मिळालेले दोनअडीचशे रुपये घेऊन अंधार पडल्यावर घरी पोहोचतात. ( Many families in villages are in open in summer )
तर उन्हाळ्यात आपलं बिऱ्हाड डोक्यावर घेत उघड्यावर तीन दगडांची चूल मांडत जेवण बनवत दिवसभर उन्हात काम करून रात्री धरतीलाच बिछाना बनवीत आकाशातील तारे व चांदण्याकडे बघत दिवसाच्या श्रमातून थकलेल्या शरीराला विराम देतात. हे चक्र अनेक वर्षे सुरूच आहे. भलेही इमारतींमधल्या घरातल्या कुटुंबांना व शहरी वस्त्यांना अच्छे दिन आलेही असतील परंतु, या कुटुंबांना आजही हाततोंडाची दररोज भेट होण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करावे लागत आहेत, हे सत्य नाकारता येणार नाही.
43 अंश सेल्सिअस मधल्या उन्हात आपण झाडाची सावली पाहतो मात्र, ही कुटुंबे नेमून दिलेली कामे तेवढ्या उन्हात करतात आणि मिळेल त्या मजुरीवर उन्हाळा पास करतात. त्यांना ना कुठे घर ना कुठे जेवायची सोय, तीन दगडांची चूल मांडत वेळेवर भेटलं तेच अन्न शिजवून पोटात ढकलत कामाला जावं लागतं, अशा कुटुंबांसाठी आपण प्रगती करतोय, हा शब्द नेहमीच फिका वाटतो. कारण त्यांच्या नशिबात आलेलं हे दुःखही पिढीच नाही, तर त्यांच्या पूर्वीच्याही पिढ्या तशाच गेल्या. त्याच्यामुळे प्रगती ही त्यांच्यापासून अजूनही कोसो दूर आहे, असेच म्हणावे लागेल.
The country progressed but many families remained in the open; 'Still deprived of a good day'.!