RBI भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनच्या सेंट्रल बँकेकडून तब्ब्ल 100 टन सोने परत आणले.! बघा.. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

RBI भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनच्या सेंट्रल बँकेकडून तब्ब्ल 100 टन सोने परत आणले.! बघा..

दि. 31.05.2024 

MEDIA VNI 

RBI भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनच्या सेंट्रल बँकेकडून तब्ब्ल 100 टन सोने परत आणले.! बघा..

मीडिया वी.एन.आय : 

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ब्रिटनच्या सेंट्रल बँकेकडून आपले 100 टन सोने परत आणले आहे. कित्येक वर्षांपासून हे सोने सेंट्रल बँक ऑफ ब्रिटेनमध्ये ठेवण्यात आलेले होते. भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचे हे प्रतिक मानण्यात येत आहे.

एकेकाळी देशातील सोने इतर देशात ठेवल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. पण आता देश त्याचे सोने परत आणण्यात येत असल्याची चर्चा रंगली आहे. आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, अजून काही टन सोने भारतात आणण्यात येईल. हा आकडा पण 100 टन इतकाच असेल, असा दावा करण्यात येत आहे. भविष्यात आर्थिक स्थिरतेसाठी हे पाऊल टाकण्यात येत आहे. यामुळे आरबीआयच्या तिजोरीतील सोन्याचा साठा वाढला आहे.

1991 नंतर पहिल्यांदा मोठे पाऊल

वर्ष 1991 नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात देशात सोने आणण्यात आले आहे आणि ते आरबीआयच्या तिजोरीत ठेवण्यात आले आहे. येत्या काही महिन्यात इतकेच सोने भारतात आणण्यात येणार आहे. आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्च महिन्याच्या अखेरीस आरबीआयकडे 822.1 टन सोने होते. त्यातील 413.8 टन सोने परदेशात ठेवण्यात आले होते. आता हे सोने हळूहळू देशात आणण्यात येत आहे. जागतिक आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत सोने खरेदी करण्यात आरबीआय आघाडीवर आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 27.5 टन सोन्याची भर घातली.

RBI का खरेदी करत आहे सोने?

जगातील अनेक केंद्रीय बँका बँक ऑफ इंग्लंडकडे अनेक वर्षांपासून सोने ठेवतात. भारत स्वातंत्र्यपूर्व काळापासून या बँककडे सोने ठेवत आला आहे. आरबीआयने काही वर्षांपासून सोने खरेदी सुरु केली आहे. तर कोण-कोणत्या देशातून सोने परत आणता येईल, याची समीक्षा करण्यात आली होती. परदेशातही आरबीआयच्या सोन्याचा साठा वाढला आहे. तर इतर बँकांचा पण साठा वाढत आहे. त्यामुळे त्यातील काही सोने देशात परत आणण्यात आले आहे. भविष्यातील परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थिती

सोने हा भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहे. देशातील प्रत्येक घरात सोने आहे. किडूकमिडूक का असेना सोने हा भारतीयांचा वीक पॉईंट आहे. 1991 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था संभाळण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान चंद्र शेखर यांच्या सरकारला सोने गहाण ठेवावे लागले होते. पण 15 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आरबिआयने 200 टन सोने खरेदी केले होते. त्यानंतर ही सोन्याच्या खरेदीत खंड पडलेला नाही.


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->