BSNL चे 5G सिम कार्ड पुण्यातून लॉन्च.! बघा व्हायरल व्हिडिओ.. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

BSNL चे 5G सिम कार्ड पुण्यातून लॉन्च.! बघा व्हायरल व्हिडिओ..

दि. 4 ऑगस्ट 2024 
MEDIA VNI 
BSNL चे 5G सिम कार्ड पुण्यातून लॉन्च.! बघा व्हायरल व्हिडिओ..
मीडिया वी.एन. आय : 
पुणे : महागड्या रिचार्जमुळे मोबाईल वापरकर्ते जेरीस आले आहेत. एकाच घरात चार-पाच मोबाईल आहेत. यांचे वर्षभर रिचार्ज करायचे म्हटले तर हजारो रुपये टेलिकॉ़म कंपन्यांना द्यावे लागणार आहेत. अशातच सर्वजण बीएसएनएल-टाटा डीलकडे डोळे लावून बसलेले असताना पुण्यातून एक मोठी बातमी येत आहे.
पुण्यातील बीएसएनएल कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एका मोठ्या ट्रेमधील बीएसएनएलची सीमकार्ड दाखविली आहेत. यामधून एका अधिकाऱ्याने बीएनएनएल ५जी लिहिलेले सीमकार्ड दाखविले आहे. अद्याप बीएसएनएलकडून अधिकृत याबाबत काही माहिती देण्यात आलेली नसली तरी या व्हिडीओने लवकरच बीएसएनएल 5G येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

बीएसएनलचे अधिकारी किशोर गवळी पुणे जिल्ह्यातील 5G कार्डचे उद्घाटन करताना या व्हिडीओत दिसत आहेत. बीएसएनएलने ४जी सेवा सुरु केलेली नसताना थेट ५ जी येत असल्याने रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया कंपन्यांचे धाबे दणाणणार आहेत.

BSNL होल्डिंग सुरुवातीला 700MHz बँड वापरणार आहे. जो स्वस्त आहे. कॅनॉट प्लेस - दिल्ली, सरकारी इनडोअर ऑफिस - बंगलोर, सरकारी कार्यालय - बंगलोर, संचार भवन - दिल्ली, जेएनयू कॅम्पस - दिल्ली, आयआयटी - दिल्ली, हैदराबाद या ठिकाणी ५जीची चाचणी घेणार आहे.

नुकतीच ट्रायल...

केंद्रीय टेलिकॉम मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सी-डॉट कॅम्पमध्ये BSNL 5G कॉलचा अनुभव घेतला आहे. कॉल करत असताना ज्योतिरादित्य शिंदे यांच्याजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, हा कॉल BSNL 5G वर करण्यात आला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांनी BSNL 5G द्वारे व्हिडिओ कॉल केला आणि त्याचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला. अलीकडे, BSNLच्या ग्राहक संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या व्हिडिओ कॉलची क्लिप शेअर करताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी लिहिले, "कनेक्टिंग इंडिया! BSNL 5G इनेबल फोन कॉल करून पाहिला."


BSNL's 5G SIM card launched from Pune! Watch the viral video..

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->