अर्थमंत्र्यांचा मोठा निर्णय! सरकारी विमा कंपन्या कार आणि आरोग्य विमा बंद करणार; काय आहे कारण.? - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

अर्थमंत्र्यांचा मोठा निर्णय! सरकारी विमा कंपन्या कार आणि आरोग्य विमा बंद करणार; काय आहे कारण.?

दि. 5 ऑगस्ट 2024 
MEDIA VNI 
अर्थमंत्र्यांचा मोठा निर्णय! सरकारी विमा कंपन्या कार आणि आरोग्य विमा बंद करणार; काय आहे कारण.? Finance Ministry 
मीडिया वी.एन.आय : 
दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांना नफ्यात आणण्यासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे. या कंपन्यांना आता केवळ फायदेशीर व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे.
विमा कंपन्यांना मोटर आणि आरोग्य विमा यांसारख्या तोट्यात चालणाऱ्या व्यवसायातून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याशिवाय या कंपन्यांना पुन्हा नोकर भरती सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. सरकारने अलीकडेच नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये 7,250 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या तिघांव्यतिरिक्त न्यू इंडिया ॲश्युरन्स आधीच नफ्यात चालू आहे.

फायदेशीर व्यवसायावर लक्ष केंद्रित करा

वित्त मंत्रालयाने या सरकारी विमा कंपन्यांना व्यवसाय वाढवण्याऐवजी फायदेशीर व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांनी सांगितले की, आम्ही सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहोत.

यंदाच्या त्यांच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. आम्हाला आशा आहे की या कंपन्यांना आणखी भांडवलाची गरज भासणार नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात आलेली नाही.

विमा कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीत सुधारणा

या तिन्ही कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीत सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. ओरिएंटल इन्शुरन्सने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 18 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. वर्षभरापूर्वी ही कंपनी 5 हजार कोटी रुपयांच्या तोट्यात होती.
नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा तोटा 3,800 कोटींवरून 187 कोटी रुपयांवर आला आहे आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्सचा तोटा 2,800 कोटींवरून 800 कोटी रुपयांवर आला आहे. दुसरीकडे, न्यू इंडिया ॲश्युरन्सचा नफा 1,100 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 

नवीन नोकर भरती होणार

या कंपन्यांचे अनेक कर्मचारी निवृत्त झाल्याचे विवेक जोशी यांनी सांगितले. नवीन कर्मचारी भरती करण्यावर बंदी होती. आता त्यांना टप्प्याटप्प्याने भरती करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या कामगिरीत सुधारणा होईल.

पूर्वी या कंपन्या वाढ दाखवण्यासाठी त्यांचा व्यवसाय वाढवत होत्या. आता त्यांना केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे. या विमा कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने 17,450 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
Finance Minister's big decision! Government insurers to discontinue car and health insurance; What is the reason.? Ministry of Finance
#nirmalasitaraman #financeminister #india #marathinews #government 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->