दि. 05 ऑगस्ट 2024
प्रारुप मतदार यादी 6 ऑगस्ट रोजी होणार प्रसिद्ध.! - हरकती सादर करण्यासाठी 20 ऑगस्टची मुदत.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : दिनांक 01 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (दुसऱ्या)अंतर्गत सुधारित वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहे. यानुसार प्रारुप मतदार यादी दिनांक 06ऑगस्ट 2024 (मंगळवार) रोजी प्रसिद्ध होणार आहे.
त्यानंतर दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी दिनांक 06 ऑगस्ट 2024 ते दिनांक 20 ऑगस्ट 2024 असेल. दाखल दावे व हरकती दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजीपर्यत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून निकाली काढल्या जातील. मतदार यादीची अंतिम प्रसिद्ध दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मतदारांनी व सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
The draft voter list will be published on August 6.
- August 20 deadline for submission of objections.! #Gadchiroli #MaharashtraNews #voter #election #maharashtra #marathinews