पूजा खेडकर नंतर गडचिरोलीतील आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश, काय आहे प्रकरण.? - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

पूजा खेडकर नंतर गडचिरोलीतील आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश, काय आहे प्रकरण.?

दि. 19 ऑगस्ट 2024 
MEDIA VNI 
पूजा खेडकर नंतर गडचिरोलीतील आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश, काय आहे प्रकरण.? 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : देशभरात गाजलेले पूजा खेडकर प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका आयएएस अधिकाऱ्याचा त्याच्या प्रशिक्षणार्थी काळातील मोठा घोटाळा समोर आला आहे. शुभम गुप्ता असे अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर आदिवासींच्या गाय वाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
आदिवासी विकास विभागाच्या नागपूर येथील अपर आयुक्तांनी याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला अहवाल दिला असून, त्यात संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस केली आहे. (Gadchiroli IAS officer Shubham Gupta has been accused of malpractice in the tribal cow distribution scheme during his trainee days)

सध्याचे सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना गडचिरोलीतील अतिदुर्गम व नक्षलप्रभावित भामरागडच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात ते कार्यरत होते. वर्षभरापूर्वी त्यांनी भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून आदिवासी लाभार्थ्यांना दुधाळ गायी वाटपाची योजनेंतर्गत लाभ दिला होता. मात्र, गाय घेण्यासाठी मंजूर निधी लाभार्थ्यांच्या खात्यातून इतरत्र वळविण्यात आल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी तक्रारी दाखल झाल्या. यानंतर आदिवासी विभागाने चौकशी समिती नेमली होती. तब्बल वर्षभरानंतर समितीने लाभार्थी, कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवत चौकशी अहवाल राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सोपविला आहे.
समितीच्या अहवालानुसार, कथित गाय वाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा आरोप शुभम गुप्ता यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच बोगस पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सह्या जोडल्याचाही ठपका त्यांच्यावर आहे. याशिवाय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील धमकावून आमच्याकडून नियमबाह्यपणे काम करून घेतल्याचा आरोप शुभम गुप्ता यांच्यावर केला आहे. दरम्यान, शुभम गुप्ता यांनी समितीने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. कोणतेही पुरावे नसताना अहवालातून चुकीच्या पद्धतीने माझ्यावर दोषारोप करण्यात आलेले आहे. त्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान, समितीच्या अहवालावर शासन काय कारवाई करणार हे पाहावे लागेल.
दरम्यान, शुभम गुप्ता हे एटापल्ली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. शुभम गुप्ता हे कंत्राटदारांना धमकावून लाच मागत असल्याची तक्रार आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दोन वर्षानंतर याही प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य आणि परिवहन विभागाचा नकारात्मक अभिप्राय असताना देखील शुभम गुप्ता यांनी लाखो रुपये खर्च करून तांत्रिक दृष्ट्या अयोग्य अशा दुचाकी रुग्णवाहिका खरेदी केल्या होत्या. सध्या त्या धूळखात पडून आहेत. त्यानंतर ते धुळे जिल्हा परिषदेत ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले. त्याठिकाणी त्यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीवर आक्षेप घेत अविश्वास आणला होता.
After Pooja Khedkar case of IAS officer in Gadchiroli exposed, what is the case.?
#गडचिरोली #Gadchiroli #GadchiroliNews #MaharashtraNews #maharashtra #marathinews #MediaVNI #IAS #government #officers 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->