दि. 06 ऑगस्ट 2024
महाराष्ट्रातील "या" जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा.!
मीडिया वी.एन.आय :
मुबंई : राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नदी पात्रांना पूर आला आहे. धरणे भरली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.पुण्यातील भिडेपूल पाण्याखाली गेला आहे. नाशिकात देखील पावसाच्या दमदार हजेरीमुळे गोदावरी नदी पात्रात पूर आला आहे.
सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून हवामान विभागाने आज मंगळवार रोजी राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आज 15 जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, पुणे सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस येणार असून या भागात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाची हजेरी लागू शकते. उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी बरसणार अशी शक्यता वर्तवली आहे.
सध्या दक्षिण गुजरात पासून उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार मेघसरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. घाट माथ्यावर पर्यटकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने रायगड, पुणे, रत्नागिरी,सातारा आणि सांगलीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे तर बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे
These" districts of Maharashtra are warned of heavy rain. #MaharashtraNews
#maratinews #MediaVNI