आता नव्याने काढा स्मार्ट निवडणूक ओळखपत्र, 'ही' कागदपत्र आवश्यक.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

आता नव्याने काढा स्मार्ट निवडणूक ओळखपत्र, 'ही' कागदपत्र आवश्यक.!

दि. 07 ऑगस्ट 2024 
MEDIA VNI 
आता नव्याने काढा स्मार्ट निवडणूक ओळखपत्र, 'ही' कागदपत्र आवश्यक.!  
मीडिया वी.एन.आय : 
मुबंई : विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू झाले आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
निवडणूक प्रक्रियेत मतदानाद्वारे सहभाग घेतला जातो. वयाची १८ वर्षे पूर्ण झाली की, त्यांना मतदानाचा हक्क मिळतो. यासाठी निवडणूक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. १९९४ पासून आजही अनेकांकडे जुने निवडणूक ओळखपत्रे आहे.

नाव, फोटो पुसट झाल्यास करा अर्ज 

१) अनेकांच्या ओळखपत्रावरील नाव व फोटो पुसट झाले आहेत. त्यामुळे मतदारांनी नवीन ओळखपत्रे काढण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

२) निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नव्याने ओळखपत्र बनवायची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आता मतदारांना आकर्षक व स्मार्ट ओळखपत्र उपलब्ध करून दिले जात आहे. 

'ही' कागदपत्रं आवश्यक 

नवीन व्होटर आयडी कार्ड काढण्यासाठी अर्जासोबत पासपोर्ट साइझ फोटो, वयाचा आणि राहत्या घराचा पुरावा, आधारकार्ड, जन्मतारखेसाठी शाळेचा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहे.

मतदारयादीत नाव आहे का?

आधीचे जुने ओळखपत्र बदलून नवीन आकर्षक व स्मार्ट ओळखपत्र मतदारांना सहज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक आहे. मतदारांनी मतदारयादीत आपले नाव शोधण्यासाठी ceo.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन व्होटर सव्र्व्हरवर क्लिक करून आपलं नाव शोधणं आवश्यक आहे.

नाव नोंदवायचे असेल तर...

मतदारांना ऑनलाइन मतदान कार्ड काढायचे असेल तर कुठल्याही सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाही, घरबसल्या ऑनलाइन अर्ज देण्यासाठी  voters.eci.gov.in या वेबसाइटवर मतदारांनी जावं.

घरबसल्या ओळखपत्रासाठी मोबाइल App

निवडणूक आयोगाने व्होटर हेल्पलाइन App सुरू केले आहे. मतदारांना आपल्या मोबाइलवरून ओळखपत्र मिळवता येईल. यात व्होटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून व्होटर आयडी कार्डसाठी अर्ज करता येतो.
Now take a new smart election ID card, 'this' document is required.!
#MediaVNI #MaharashtraNews #marathinews #india #election #voter #electionidcard 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->