दि. 14 सप्टेंबर 2024
MEDIA VNI
अहेरीत 'आत्राम' घराण्यात सत्तेसाठी गेम; बाप-लेकीचा विरोध नसून ही सत्तेसाठी 'चाल'.!
- आझाद समाज पार्टीचे कार्याध्यक्ष विनोद मडावी यांचा घणाघात.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : विद्यमान कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांची लेक भाग्यश्री आत्राम यांचा वाद विकोपाला गेल्याचे चित्र प्रसार माध्यमांच्या द्वारा पाहायला मिळत आहे. परंतु हा आतून विरोध नसून जनतेला मूर्ख बनवून सत्ता घरात कशी राहील यासाठी केलेला मोठा गेम आहे. असा घणाघात आझाद समाज पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी यांनी केला आहे.
गेल्या पंचवार्षिक मध्ये धर्मरावबाबा आत्राम यांच्या क्षेत्रातील लोकांच्या प्रश्न- समस्या सोडविण्याबाबत जनतेमध्ये प्रचंड नाराजी असल्याने आणि खदान विषयक भूमिकेमुळे क्षेत्रातील प्रभाव कमजोर झाल्याचे त्यांना स्वतःला समजत आहे. अशात राजे अमरीशराव महाराज यांनी सुद्धा आगामी विधानसभेसाठी प्रचारात जोर बांधत आवाहन उभे केले आहे. चुकून अमरीश महाराज शरद पवार यांचे राष्ट्रवादी कडून तिकीट मिळाले तर धर्मरावबाबा आत्राम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकरता येत नाही.
आणि हातातून सत्ता जाने हे आत्राम घराण्याला परवडण्यासारखे नाही. यामुळे लेक भाग्यश्री आत्राम यांनाचा शरद पवारांकडे पाठवून जर सीट मिळवली तर बाप विरुद्ध लेक अशी लढत होऊन दोघांपैकी एक निवडून येण्याचीं संधी जास्त आहे. निवडून कुणीही आला तरी सत्ता मात्र "आत्राम घरण्यात" च राहील अशा गनिमी काव्याने बाबा आत्राम गेम करत असल्याचा आरोप आझाद समाज पार्टी ने केला आहे.
जनतेने अशा दुटप्पी भूमिकेला बळी पडू नये असे आवाहन सुद्धा विनोद मडावी यांनी केले आहे.
Game for power in Aherit 'Aatram' family; This is a 'move' for power, not opposition to Bap-Leki. Father and Daughter Politics
- Azad Samaj Party working president Vinod Madavi
Dharmarao Baba Atram - Bhagyashree Atram
#गडचिरोली #Gadchiroli #GadchiroliNews #Aheri #AheriNews #Vidhansabha #VidhansabhaElection #MaharashtraNews
#MediaVNI #political #politics