मआविम गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यात नवीन उद्योगांच्या प्रकल्पांना चालना देण्यात यावी; - प्रणयभाऊ खुणे - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

मआविम गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यात नवीन उद्योगांच्या प्रकल्पांना चालना देण्यात यावी; - प्रणयभाऊ खुणे

दि. 11 सप्टेंबर 2024  
MEDIA VNI 
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यात नवीन उद्योगांच्या प्रकल्पांना चालना देण्यात यावी.! 
- जिल्ह्यात सॅनिटरी नॅपकिन (रियुजेबल क्लॉथ पॅड) प्रकल्प उभारणार.! 
- प्रणयभाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : गडचिरोली येथील राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोलीच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा मनिषाताई मडावी यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष प्रणयभाऊ खुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळ येथील कार्यालयात आज गडचिरोली शहरातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाच्या कार्यकर्त्या यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा गडचिरोली समन्वयक झाडे व सचिन देवतळे यांची सदिच्छा भेट घेतली. गडचिरोली जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्य विषयावर सविस्तर चर्चा केली.
आणि गडचिरोली जिल्ह्यात महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी प्रथम प्राधान्य देऊन महिलांच्या रोजगार आणि स्वयंरोजगार संदर्भात नवीन प्रकल्प उभारणी करण्याबाबत मागणी करण्यात आले यावेळी प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील व जंगलव्याप्त भागात राहणाऱ्या माता भगिनी यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची बाब म्हणून जिल्ह्यात सॅनिटरी नॅपकिन (रियुजेबल कलॉथ पॅड) प्रकल्प उभारण्याबाबत काय करता येईल ? यासंदर्भात चर्चा करण्यात आली सदर प्रकल्प आराखडा तयार करण्याबाबत ठरले व लवकरच गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आरोग्याच्या संदर्भातील जागरूकता करण्याबाबत ठरवण्यात आले.
आणि यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उद्योजक प्रणय भाऊ खुणे यांनी गडचिरोली जिल्ह्यात सॅनिटरी नॅपकिन (रियुजेबल क्लॉथ पॅड ) प्रकल्प उभारण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे सांगितले, व या विषयावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असे सांगितले. यावेळी अतिसंवेदनशील वनव्याप्त भागात राहणाऱ्या महिलांच्या आरोग्याच्या विषयावर चर्चा करण्यात आले यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेन्द्र विश्वास, विदर्भ राष्ट्रीय मानवाधिकार संघटना अध्यक्ष जावेद भाई अली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, शिक्षक जगदीश मडावी व मानवाधिकार संघटना महिला कार्यकर्त्या लक्ष्मी कन्नाके, तेजस्विनी भजे, मंजुषा आत्राम, शितल चीकराम व महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
On behalf of the Women's Economic Development Corporation District Gadchiroli, the projects of new industries should be promoted in the district.
A sanitary napkin (reusable cloth pad) project will be set up in the district. 
- Pranaybhau Khune State President, National Human Rights Organization.! 
 #pranaykhune Pranay Khune News 
#gadchiroli #MaharashtraNews #MediaVNI 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->