चोरीच्या गुन्ह्रातील दोन आरोपीतांना गडचिरोली पोलीसांनी केली अटक.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

चोरीच्या गुन्ह्रातील दोन आरोपीतांना गडचिरोली पोलीसांनी केली अटक.!

दि. 09 सप्टेंबर 2024 
MEDIA VNI 
चोरीच्या गुन्ह्रातील दोन आरोपीतांना गडचिरोली पोलीसांनी केली अटक.! 
- गुन्हा दाखल झाल्याच्या बारा तासाच्या आत गुन्हा उघड करुन आरोपीतांना घेतले ताब्यात.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : दिनांक 06 सप्टेंबर 2024 रोजी फिर्यादी नामे प्रियंका विवेक मेश्राम, वय 29 वर्षे, रा.आंबेडकर वार्ड, देसाईगंज तह. देसाईगंज, जि. गडचिरोली यांनी पोस्टे देसाईगंज येथे येऊन सांगितले की, फिर्यादी ही दिनांक 05 सप्टेंबर  2024 रोजी आपल्या पतीसोबत कार क्र. एम एच 02 बी वाय 3565 ने घरघुती सामान ठेवलेली बॅग व छोट्या पर्समध्ये चार नग सोन्याची अंगठी ठेवलेली एक बॅग अशा दोन बॅग गाडीच्या सीटमागे ठेवून मौजा ब्राम्हपूरी मार्गे देसाईगंज येथे येत असतांना मौजा चिचोली येथील अण्णा बार समोर नामे मयंक रविंद्र सेदरे वय 24 वर्षे व त्याचा साथीदार विधिसंघर्षित बालक नामे 
वय 16 वर्षे, दोघेही रा. आंबेडकर वार्ड, देसाईगंज हे दोघेही रस्त्यावर त्यांची गाडी थांबवून मदत मागितली असता, दोन्ही इसम ओळखीचे व आंबेडकर वार्ड देसाईगंज येथील असल्याने त्यांना गाडीत बसवून आंबेडकर वार्ड देसाईगंज येथे घेऊन आल्यानंतर दोघेही इसम गाडीतून उतरुन आपल्या घरी गेले. त्यानंतर फिर्यादी हिने घरात जाऊन बॅग उघडुन पाहिली असता, बॅगमध्ये छोट्या पर्समध्ये असलेल्या चार नग सोन्याच्या अंगठी दिसून आल्या नाहीत. वरील वर्णनाचा माल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेले, अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरुन अज्ञात आरोपीतांविरुद्ध पोस्टे देसाईगंज येथे अप क्र. 248/2024 कलम 303 (2) भा.न्या.सं अन्यये गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यावरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे देसाईगंज पोनि. अजय जगताप यांच्या नेतृत्वात सपोनि. संदिप आगरकर व त्यांच्या पोलीस स्टाफ यांनी यातील संशयित आरोपीतांचा शोध घेतला असता, मिळालेल्या खात्रीशिर गोपनिय माहितीच्या आधारे संशयित आरोपी इसम नामे 1) मयंक रविंद्र सेंदरे, वय 24 वर्षे, रा. आंबेडकर वार्ड, देसाईगंज यास दिनांक 06 सप्टेंबर 2024 रोजी सदर गुन्ह्रात ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, आरोपी याने त्याचा साथीदार 2) विधिसंघर्षित बालक नामे वय 16 वर्षे, रा. आंबेडकर वार्ड, देसाईगंज याचे सोबत मिळून संगनमताने सदरचा चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन आरोपी क्र. 01 यास दिनांक 06 सप्टेंबर  2024 च्या रात्रो अटक करण्यात आली व त्याला मा. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे. यासोबतच आरोपीतांकडून रिमांड कालावधीमध्ये गुन्ह्राच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता, गुन्ह्रात चोरीस गेलेला माल एकुण 04 नग सोन्याच्या अंगठी, वजन अंदाजे 24 ग्रॅम, किंमत 72,000/- रु. असा संपूर्ण मुद्देमाल आरोपीतांकडुन हस्तगत करण्यात आला. तसेच सदर गुन्ह्रात विधिसंघर्षित बालकाचे पालक यांना सूचनापत्र देऊन बाल न्यायमंडळापुढे हजर करण्याबाबतची तजवीज ठेवलेली आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि. संदिप आगरकर करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे देसाईगंज पोनि. अजय जगताप यांच्या नेतृत्वात सपोनि. संदिप आगरकर, पोहवा/हेडाऊ, पोअं/मेश्राम, सराटे, बालमवार यांनी केलेली आहे.
Gadchiroli police arrested two accused in the crime of theft. 
- Within twelve hours of the filing of the case, the accused were arrested after reveal
#गडचिरोली #Gadchiroli #GadchiroliNews #MaharashtraNews #MediaVNI 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->