विधानसभेत भाजपला मोठा फटका बसणार? 105 पैकी तब्बल 'इतक्या' जागा धोक्यात, आमदार धास्तावले.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

विधानसभेत भाजपला मोठा फटका बसणार? 105 पैकी तब्बल 'इतक्या' जागा धोक्यात, आमदार धास्तावले.!

दि. 17 सप्टेंबर 2024 
MEDIA VNI 
Maharashtra Politics : विधानसभेत भाजपला मोठा फटका बसणार? 105 पैकी तब्बल 'इतक्या' जागा धोक्यात, आमदार धास्तावले.! 
मीडिया वी.एन.आय : 
मुबंई : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेते सतर्क झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांनी वेगवेगळ्या रणनित्या आखण्यास सुरुवात केली आहे. 
यासाठी बैठकांचा धडाका देखील सुरु आहे. नुकतीच भाजपची एक बैठक पार पडली. या बैठकीत गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या १०५ जागांचा आढावा घेण्यात आला. यापैकी ८५ जागा या निवडणुकीतही आपण जिंकू असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
मात्र, २५ जागा धोक्यात असून त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार, असा सूर पक्षाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या बैठकीत देखील या जागांवर विजय मिळवण्यासाठी चर्चा होत आहे. २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने तब्बल १२२ जागा जिंकल्या होत्या.

मात्र, २०१९ मध्ये यापैकी १७ जागा कमी झाल्या. शिवसेनेसोबत युती असूनही भाजपला केवळ १०५ जागांवरच विजय मिळवता आला. आता आगामी निवडणुकीत १०५ पैकी तब्बल २५ जागा धोक्यात असल्याचा अहवाल भाजपला प्राप्त झाला आहे. कुठल्याही परिस्थिती या जागा जिंकता याव्यात यासाठी वेगवेगळ्या रणनित्या आखल्या जात आहेत.

सध्या भाजपकडून ८५ जागांवर विशेष लक्ष केंद्रीय केले जात आहे. या जागा निवडून येण्याच्या शक्यतेच्या आधारे ए, बी आणि सी कॅटेगिरी करण्यात आल्या आहेत. यामध्ये २०१४, २०१९ आणि २०१४ पासूनच्या तीन लोकसभा निवडणुकांत भाजपला बुथनिहाय झालेले मतदान आणि यावेळी किती मतदान मिळून शकते, याचा अंदाज बांधला जात आहे.
दरम्यान, ज्या ८५ जागा जिंकण्याचा भाजपला विश्वास आहे. त्या सर्वच जागा गेल्यावेळी जिंकलेल्या आहे असं नाही. त्यापैकी ५ ते ७ जागा धोक्यात आहेत. गेल्यावेळी ७ जागा भाजपने अत्यंत कमी मताधिक्यांनी जिंकल्या होत्या. यावेळी या जागांवर पराभवाला सामोरे जावे लागू शकते, असं पक्षश्रेष्ठीचे मत आहे.

पण हरलेल्या ५ ते ७ जागा पुन्हा जिंकता येऊ शकतात. असा फील्डबॅक पक्षश्रेष्ठीत महत्वाच्या पदावर असलेल्या नेत्याने दिला आहे. दुसरीकडे भाजप महायुतीमध्ये १५५ ते १६० जागा लढवण्याची शक्यता आहे. यातील १२५ जागा जिंकण्याचे ध्येय पक्षाने ठेवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra Politics : BJP will suffer a big blow in the assembly? As many as 'so many' seats out of 105 are at risk, MLAs are scared!
#महाराष्ट्र #MaharashtraNews #maharashtra #MediaVNI #politics 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->