दि. 20 सप्टेंबर 2024
MEDIA VNI
महाविद्यालयीन शिक्षणासोबतच कौशल्य विकासातून रोजगारक्षम बना; - जिल्हाधिकारी संजय दैने.! - 13 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : जिल्ह्यातील युवक व युवतींनी महाविद्यालयीन शिक्षणासोबतच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रातील प्रशिक्षणाचा लाभ घेवून आपले कौशल्य विकसित करण्याचे व रोजगारक्षम बनण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील 13 व राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा’चे वर्धा येथून आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सर्व केंद्रावर विविध मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात सुरू असलेल्या थेट प्रक्षपणाला जिल्हाधिकारी संजय दैने, विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. प्रशांत बोकारे, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे आष्टी येथून आमदार डॉ देवराव होळी, आरमोरी येथून आमदार कृष्णा गजबे व इतर मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यात ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ सुरू करण्यात आलेली महाविद्यालये:
केवळरामजी हरडे कॉलेज ऑफ एग्रीकल्चर चामोर्शी, केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी, एडवोकेट एन.एस. गंगुवार कॉलेज ऑफ एज्युकेशन गडचिरोली, श्री.एम. एस. कोवासे कॉलेज ऑफ फार्मसी, गडचिरोली, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, इंदिरा गांधी महाविद्यालय गडचिरोली, गडचिरोली पॅरामेडिकल कॉलेज गडचिरोली, महात्मा गांधी आर्ट्स, सायन्स अँड लेट एन. पी.कॉमर्स कॉलेज, राजे धर्मराव आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज अल्लापल्ली, श्री.किसनराव खोब्रागडे महाविद्यालय वैरागड तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली, श्री.सद्गुरु साईबाबा सायन्स अँड कॉमर्स कॉलेज आष्टी, महिला महाविद्यालय गडचिरोली, श्री.जे.एस.पी.एम. आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज धानोरा.
Become employable through skill development along with college education; - Collector Sanjay Daine.!
- Acharya Chanakya Skill Development Center in 1
#maharashtra #MediaVNI #MaharashtraNews #gadchiroli #GadchiroliNews