दि. 29 सप्टेंबर 2024
शिक्षण मंत्र्यांकडून उदयनगर बांग्ला प्राथमिक शाळा सन्मानित.!- परसबाग निर्मितीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : परसबाग निर्मिती मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मूलचेरा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदयनगर यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज पूणे येथे आयोजित कार्यक्रमात प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर पुरस्कार मुख्याध्यापक दीपक मंडल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजय सरकार शालेय पोषण आहारचे अधीक्षक श्री बारेकर यांनी स्विकारला. जिल्हाधिकारी संजय दैने व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांना शाळेचे व गडचिरोली जिल्ह्याचे नाव संपूर्ण राज्यात उज्ज्वल केल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शाळांमधून परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता घेण्यात आलेल्या परसबाग स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील उदयनगर बांग्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. शालेय परसबाग स्पर्धेकरिता तालुकास्तरावरील परसबागांचे मूल्यांकन करण्यात येऊन प्रत्येक जिल्ह्यांतून एक परसबाग राज्यस्तरीय मूल्यांकनास पात्र ठरलेली होती. अशा सर्व जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या परसबागेचे परिक्षण पूर्ण करण्यात येवून निर्धारित निकषांच्या आधारे राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय-दोन, तृतीय आणि प्रोत्साहनपर तीन अशा शाळांची निवड करण्यात आली.
Udayanagar Bangla Primary School honored by Education Minister.!
- First rank in the state in garden production.! #गडचिरोली #Gadchiroli #MaharashtraNews #Maharashtra #MediaVNI