दि. 23 ऑक्टोंबर 2024
गडचिरोली येथील जंगलात ५ नक्षलवादी ठार, तर १ सैनिक घायाळ.!मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : २१ ऑक्टोबरला गडचिरोली- छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत ठार झालेल्या ५ नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यात दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली पोलिसांनी पहिल्यांदाच नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुडमाडमध्ये शिरून ही कारवाई केली, अशी माहिती मंगळवारी पोलीस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा
घातपाताचा डाव गडचिरोली पोलिसांनी उधळून लावला आहेे. छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात नक्षलवादी आणि सैनिक यांच्यात अनुमाने १० घंटे चाललेल्या चकमकीत पोलिसांनी ५ नक्षलवाद्यांना ठार केले.
या चकमकीत १ सैनिक घायाळ झाला असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.
कोपर्शी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असतांना नक्षलवाद्यांनी सैनिकांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात २१ ऑक्टोबर या दिवशी सकाळी चकमक चालू झाली. ती दुपारी ४ वाजेपर्यंत चालूच होती. या वेळी सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. २ वेगवेगळ्या ठिकाणी ही चकमक झाली.
या घटनेनंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अपर पोली अधीक्षक यतीश देशमुख, एम्.रमेश यांच्या नेतृत्वाखाली 'सी-६०' पथकाच्या २२ तुकड्या आणि 'सी.आर.पी.एफ्.'च्या शीघ्रकृती दलाच्या २ तुकड्या कोपर्शी जंगलात पाठवल्या. जंगलात २ वेगवेगळ्या ठिकाणी माओवादविरोधी अभियान राबवण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.
5 naxalites killed, 1 soldier injured in Gadchiroli forest!
#गडचिरोली #Gadchiroli #gadchirolipolice