महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले, 20 नोव्हेंबरला मतदान.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले, 20 नोव्हेंबरला मतदान.!

दि. 15 ऑक्टोंबर 2024 
MEDIA VNI 
Assembly Elections : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले, 20 नोव्हेंबरला मतदान.!
मीडिया वी.एन.आय : 
मुबंई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं (Assembly Elections) बिगुल अखेर वाजलं असून, केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर कार्यक्रम आज (दि.15) जाहीर केला आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर ही पहिली विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्याने आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रासह निवडणूक आयोगाने झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभांच्या तारखांचीही घोषणा केली आहे. या ठिकाणी दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार असून, निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.

Assembly Elections काय म्हणाले निवडणूक आयुक्त?

महाराष्ट्रा एकूण 9.63 कोटी मतदार असून, यातील 234 जागा या सर्वधाराण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. महाराष्ट्रात एक लाख 186 पोलिंग बुथ असतील. यात पुरूष मतदार ४ कोटी ७७ लाख आहेत. यात 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. व्होटर हेल्पलाईन अॅपमध्ये त्यांचे मतदान नेमके कुठे आहे, ते पाहू शकतील असेही राजीव कुमार यांनी सांगितले. मतदार, पूर्ण मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण होणार असून, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात माहिती द्यावी लागणार आहे. महाराष्ट्रात १ लाख १८६ पोलिंग स्टेशन, 57 हजार 601 ग्रामीण पोलिंग स्टेशन, शहरी 42 हजार 582 पोलिंग स्टेशन 85 वर्ष वरच्या मतदारांना घरातून मतदान करता येणार मोठीं रांग असेल तर मध्ये खुर्ची व्यवस्था केली जाणार

Assembly Elections मागील वेळी किती टप्प्यात झाल्या होत्या निवडणुका?

या आधी म्हणजे 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. तर, 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, सत्तास्थापनेसाठी 145 चे बहुमत आवश्यक आहे. गेल्यावेळी म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला 105, शिवसेना- 56, राकांपा- 54, काँग्रेस - 44 अपक्ष - 13 तर, अन्य- 16 जागा मिळाल्या होत्या.

तर, 2019 मध्ये झारखंड विधानसभा निवडणूक पाच टप्प्यात झाली होती. यात पहिला टप्पा 30 नोव्हेंबर, दुसरा 7 डिसेंबर, तिसरा 12 डिसेंबर, चौथा 16 डिसेंबर आणि पाचव्या टप्प्यातील मतदान 20 डिसेंबर रोजी झाले होते. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आले होते.

निवडणूक आयुक्तांचं EVM बाबत मोठं विधान म्हणाले, "ईव्हीएमध्ये कोणतीही.."

Assembly Elections निर्णयांचा अन् योजनांचा पाऊस

विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारकडून गेल्या काही दिवसात पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये निर्णयांचा धडाका लावला होता. यात अंगणवाडी सेविकांचे आणि होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर, काल (दि.14) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. याशिवाय मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजनाही जाहीर करण्यात आली होती. या योजनेतंर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला होतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Assembly Elections महायुती-महाविकास आघाडीचं बलाबल

महायुती - 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाआघाडी - 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)

Assembly Elections महाराष्ट्र विधानसभा 2019 निकाल आणि पक्षीय बलाबल

भाजप - 105
शिवसेना - 56
राष्ट्रवादी - 54
काँग्रेस - 44
बहुजन विकास आघाडी - 03
प्रहार जनशक्ती - 02
एमआयएम - 02
समाजवादी पक्ष - 02
मनसे - 01
माकप - 01
जनसुराज्य शक्ती - 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष - 01
शेकाप - 01
रासप - 01
स्वाभिमानी - 01
अपक्ष - 13
एकूण - 288
Assembly Elections: The bugle has finally sounded for the assembly elections in Maharashtra, voting on November 20.!

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->