दि. 10 ऑक्टोंबर 2024
टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे निधन.! मीडिया वी.एन.आय :
मुंबई : टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
बुधवारी (दि.9) साडे अकरा वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
दोन दिवसांपुर्वी रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यानंतर 'काळजीचे कोणतेही कारण नाही. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात आणले गेले आहे' असे त्यांच्याकडून कळवण्यात आले होते. मात्र बुधवारी ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली आहे.