प्रणय खुणे यांचे साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी चे वतीने मानद डॉक्टरेट उपाधीने चेन्नई गुरुकुल येथे सन्मान.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

प्रणय खुणे यांचे साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी चे वतीने मानद डॉक्टरेट उपाधीने चेन्नई गुरुकुल येथे सन्मान.!

दि. 09 ऑक्टोंबर 2024 
MEDIA VNI 
प्रणय खुणे यांचे साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी चे वतीने मानद डॉक्टरेट उपाधीने चेन्नई गुरुकुल येथे सन्मान.!
- महाराष्ट्र राज्यातून जागतिक स्तरावर प्रणय खुणे यांच्या कार्याची दखल.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : चेन्नई येथे 5 ऑक्टोंबर रोजी जागतिक स्तरावरील साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीचे वतीने दरवर्षी चेन्नई येथील गुरुकुल येथे आयोजित संपूर्ण देशभरातील प्रत्येक राज्यातून विविध कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या युनिव्हर्सिटीच्या वतीने जागतिक स्तरावरील मान सन्मानाचा मानद डॉक्टरेट उपाधीने आज गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात व प्रामुख्याने मानवाधिकार ( मानवी हक्क व ग्राहक संरक्षण) क्षेत्रातील गडचिरोली जिल्ह्यात उत्कृष्ट कार्याबद्दल कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील रहिवासी गडचिरोली जिल्ह्यातील येथील स्थानिक निवासी प्रणय खुणे यांना त्यांनी जिल्ह्यत केलेल्या मानवाधिकार क्षेत्रात (मानवी हक्क, ग्राहक संरक्षण ) विषयवार उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तसेच आपल्या शासकीय सेवेदरम्यान विविध गाव खेड्यात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल जागतिक स्तरावरील साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने घेतली व दरवर्षी संपूर्ण भारत देशातून प्रत्येक राज्यातील एका सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानद डॉक्टर उपाधीने प्रदान करून सन्मान केला जातो यामध्ये प्रणय खुणे यांची निवड करण्यात आली आणि त्यांना डॉक्टर ऑफ सोशल वर्क चे स्पेशलायझेशन इन हुमन राइट्स कंजूमर राइट्स प्रोटेक्शन ( मानवी हक्क व ग्राहक संरक्षण ) या विषयावर त्यांना चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय गुरुकुल येथे मानद डॉक्टरेट उपाधी प्रदान करण्यात आले.

यावेळी वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीचे वतीने मिस्टर सेलवम, चेअरमन ग्लोबल एचीवर कौन्सिल यांच्या मार्गदर्शनात मिस्टर यार कानन इंडियन फिल्म डायरेक्टर, एडवोकेट साथी असलिन, ऑल इंडिया एडवोकेट फेडरेशन, डॉक्टर जे पी विमल डायरेक्टर शिबा ग्रुप ऑफ स्कूल चेन्नई ,डॉ, यूपी कृष्णन, डॉ, जॉन पीटर ओसबॉर्न , फिल्म ऍक्टर सेनेमाराई चेन्नई , मिस्टर स्नेहील, फिल्म एक्टर काम बाम ( मीना) सेल्वी, डॉ, मिलिंद दहिवडे, मेंबर ऑफ मायनॉरिटी कमिशन दिल्ली , डॉ, पुण्यमूर्ती चेअरमन तमिळनाडू कंजूमर पीपल राईट प्रोटेक्शन मुव्हमेंट चेन्नई, व चेन्नई येथील गुरुकुलचे प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

या निवडीबद्दल राष्ट्रीय सल्लागार नाना नाकाडे, कोहळी समाज जिल्हा उपाध्यक्ष विवेक बुद्धे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष सौ, पौर्णिमा, विदर्भ महिला आघाडी अध्यक्ष सौ, पायल कापसे, मार्गदर्शक राहुल झोडे, राकेश डोंगरवार, लोकेश डोंगरवार ,विदर्भ अध्यक्ष जावेद अली, विदर्भ सचिव अनिल गुरणुले, संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डू खुणे, देवानंद पाटील खुणे,भंडारा जिल्हाध्यक्ष नंदू समरीत, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश गजपूरे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष मुन्ना दहाडे, कुरखेडा तालुका अध्यक्ष मंगेश कऱ्हाडे, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम गोबाडे, कृष्णा वाघाडे, जिल्हा संघटन सचिव स्वप्नील मडावी, भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर, मुलचेरा तालुका, अध्यक्ष सचिन विश्वास, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, उपाध्यक्ष लक्ष्मी कन्नाके, तेजस्विनी भजे, जाहेदा शेख, व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रणय खुणे यांचे अभिनंदन केले.
Pranay Khune honored with honorary doctorate degree by South Western American University at Chennai Gurukul.
- Pranay Khune's work is recognized globally from the state of Maharashtra. 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->