दि. 09 ऑक्टोंबर 2024
गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होने हे माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी.! - मा.खा.अशोकजी नेते यांचे गडचिरोली नियोजन भवन येथे आयोजित वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुबंई अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गडचिरोली उद्घाटन सोहळा नियोजन भवन गडचिरोली येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आले होते.
या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी नियोजन भवन गडचिरोली येथे माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी बोलतांना म्हणाले गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल आंकाक्षीत नक्षलग्रस्त जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्हयातील गडचिरोली मध्ये शासकीय मेडिकल कॉलेज झाला पाहिजे यासाठीं मी अतोनात प्रयत्नाने मंजुर करुन घेतला. ज्यावेळी केंद्र सरकारनी चौविस (२४ ) मेडिकल कॉलेजला मान्यता देण्यात आली. पण गडचिरोली ला मेडिकल कॉलेज देण्याची मान्यता प्रस्तावित नव्हतं तेव्हा ही बाब माझ्या लक्षात येताच त्यावेळी मी स्वतः दिंं. ०९ डिसेंबर २०२२ ला लोकसभेध्ये तारांकित प्रश्न मांडून गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल आकांक्षीत जिल्हयात मेडिकल कॉलेज किती महत्वाचे आहे. हे राज्य सरकार ला पटवून दिल्या नंतर ह्या संपुर्ण बाबीं निदर्शनास आणुन देत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी लोकसभेत राज्य सरकारनी तसा प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार मेडिकल कॉलेजला मंजुरी देणार अशी घोषणा केली त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान.ना.श्री.एकनाथ जी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मान.ना.देवेंद्र जी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत चर्चा व निवेदनाद्वारे मेडिकल कॉलेज चा प्रस्ताव राज्य सरकारनी केंद्र सरकारला मंजुरी साठी पाठवावे असाही बाध्य केला.अखेर मी केलेल्या अथक परिश्रमाला यश आले.व मेडिकल कॉलेज मंजूर केल त्याच आज दि.०९ आक्टोंबर २०२१ रोजी देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींजी यांच्या शुभहस्ते दुर दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन होत आहे हे माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनातील कार्याचे फलीत आहे.आज माझ्या जीवनातील अविस्मरणीय व स्वप्नपूर्ती दिवस उजडला आहे असे मत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयोजित कार्यक्रमातील गडचिरोली येथील नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते हे बोलत होते.
याबरोबरच पुढे बोलतांना मान.उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र जी फडणवीस हे गडचिरोलीतील जनतेच्या आरोग्याची काळजी घेत वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोलीत दिलेली अनोखी भेट आहे.असे बोलत या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन समारंभ सोहळा प्रसंगी देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र मोदीजी यांचे धन्यवाद ! मानीत मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन करतोय या सोबतच मुख्यमंत्री मा.एकनाथ जी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र जी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांचे ही धन्यवाद ! व अभिनंदन असे वक्तव्य माजी.खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी नियोजन भवनातील आयोजित कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले.
या प्रसंगी मंचावर प्रामुख्याने गडचिरोली चिमुर लोकसभेचे खासदार नामदेवराव किरसान, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अधिष्ठाता शा.वै.म.डॉ. अविनाश टेकाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा उप चिकित्सक डॉ. सोळंकी साहेब, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश जी गेडाम, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मेडिकल कॉलेजची संकल्पपूर्ती
गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेला आरोग्याची दर्जेदार सेवा मिळण्यासाठी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळण्यासाठी जिल्ह्यात सर्वप्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना व्हावी, अशी मागणी लोकसभेच्या सभागृहात सतत तारांकीत प्रश्नातून मांडून केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून माझ्या प्रयत्नाना अखेर यश आले व माझा संकल्प पूर्ण झाल्याचा मला आनंद होत आहे.
Having a Government Medical College in Gadchiroli is the biggest achievement of my political life.
- Statement by M.Kha.Ashokji Nete on the occasion of inauguration of Medical College organized at Gadchiroli Nijjan Bhawan.