दि. 26 ऑक्टोंबर 2024
गडचिरोलीमध्ये सेल्फी काढतांना एका तरुणाला हत्तीने चिरडले.!मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील आबापूर जंगलात एक घटना घडली आहे. जंगलात तीन मित्र गेले होते. त्यापैकी एक सेल्फी काढत असताना हत्तीने तरुणावर हल्ला केला आणि त्याला चिरडून ठार केल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 23 वर्षीय हा तरुण आपल्या दोन मित्रांसह महाराष्ट्रातील गडचिरोली येथील अंबापूरच्या जंगलात गेला होता. तरुणाने जंगली हत्तीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, पण हत्तीने हल्ला करून त्याला ठार केले. इतर दोघे मित्र पळून जाण्यात यशस्वी झाले.
तसेच महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील आबापूर जंगलात ही घटना असून मृत तरुण त्याच्या काही मित्रांसह नवेगाव येथून गडचिरोली जिल्ह्यात केबल टाकण्याच्या कामासाठी आला होता.
दोन दिवसांपूर्वी, मंगळवारी चितगाव आणि गडचिरोली वनपरिक्षेत्रातून एका जंगली हत्तीला सोडण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मुतनूर वनपरिक्षेत्रातील आबापूर जंगलात हत्ती फिरत असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी मृत तरुण आणि त्याचे दोन मित्र कामानिमित्त परिसरात होते. दरम्यान त्यांनी हत्ती बघायला जायचे ठरवले.
तसेच त्यांना हत्ती दिसल्यानंतर मृत तरुणाने दुरूनच हत्तीसोबत सेल्फी घेण्याचे ठरवले तेव्हा हत्तीने हल्ला करून त्याला तरुणाला चिरडले व ठार केले असे सांगण्यात येत आहे.
A young man was crushed by an elephant while taking a selfie in Gadchiroli.