दि. 26 ऑक्टोंबर 2024
Maharashtra Election : काँग्रेसची 16 जणांची तिसरी यादी जाहीर.! गडचिरोली मधून मनोहर पोरेटी यांना उमेदवारी घोषित.!मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहे. आता काँग्रेसने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 16 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आज सकाळीच काँग्रेसची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर आजच संध्याकाळी तिसरी यादी देखील काँग्रेसने जाहीर केली आहे. आत्तापर्यंत काँग्रेसने 87 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
या यादीमध्ये कोणाकोणाला दिली उमेदवारी.?
खामगाव – राणा दिलीपकुमार सनदा
मेळघाट (ST) – डॉ. हेमंत नंदा चिमोटे
गडचिरोली (ST) – मनोहर तुळशीराम पोरेटी
दिग्रस – माणिकराव ठाकरे
नांदेड (दक्षिण ) – मोहनराव मारोतराव अंबाडे
देगलूर (SC) – निवृत्तीराव कोंडीबा कांबळे
मुखेड – हणमंतराव बेटमोगरेकर
मालेगाव मध्य – एजाज बेग अजीज बेग
चांदवड – शिरीषकुमार कोटवाल
इगतपुरी (ST) – लखीभाऊ जाधव
भिवंडी वेस्ट – दयानंद चोरगे
अंधेरी वेस्ट – सचिन सावंत
वांद्रे वेस्ट – असिफ झकारिया
तुळजापूर – कुलदीप धीरज आपासाहेब कदम पाटील
कोल्हापूर उत्तर – राजेश भरत लाटकर
सांगली – पृथ्वीराज गुलाबराव पाटील
Maharashtra Election: Third list of 16 members of Congress announced! Manohar Poreti declared candidacy from Gadchiroli.