दि. 26 ऑक्टोंबर 2024
Congress Candidates 2nd List: काँग्रेसची दुसरी यादी आली समोर, MVA मध्ये नवं राजकारण?Maharashtra Vidhansabha Election 2024 Congress 2nd List of Candidates:
मीडिया वी.एन.आय :
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी काँग्रेसने आता त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
त्याआधी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हायकमांडशी चर्चा केली. या बैठकीत राहुल गांधी यांनी जागा वाटपाबाबत राज्यातील नेत्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. दरम्यान, दुसऱ्या यादीनंतर आता महाविकास आघाडीमधील राजकारण अधिक रंगतदार होणार आहे.
पहिल्या यादीत काँग्रेसने 48 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. आता दुसऱ्या यादीत काँग्रेसने 23 उमेदवारांना तिकीट जाहीर केलं आहे.
मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेना (UBT) मध्ये रस्सीखेच सुरूच आहे. त्यामुळे अद्यापही महाविकास आघाडीचा नेमका फॉर्म्युला काय हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष हे सध्या अत्यंत जपून पावलं टाकत आहेत.
अधिक प्रमाणात बंडखोरी होऊ नये यासाठी देखील ही रणनीती असण्याची शक्यता आहे. मात्र, असं असलं तरीही ज्या पद्धतीने यादी जाहीर होण्यास विलंब होत आहेत त्यामुळे अनेक नेत्यांच्या मनात मात्र चलबिचल सुरू झाली आहे.
पाहा काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress 2nd Candidates List)
राजेश मानवतकर- भुसावळ
स्वाती वाटेकर- जळगाव-जामोद
शेखर-शेंडे- वर्धा
अनुजा केदार- सावनेर
गिरीश पांडव- नागपूर दक्षिण
सुरेश भोयर- कामठी
पूजा ठावकर- भंडारा
सुरेश बनसोड- अजुर्नी मोरगाव
राजकुमार पुरम- आमगाव
वसंत पुरके- राळेगाव
अनिल मंगुलकर- यवतमाळ
जितेंद्र मोघे- अरणी
साहेबराव कांबळे- उमरखेड
कैलास गौरंट्याल- जालना
मधुकर देशमुख- संभाजीनगर पूर्व
विजय पाटील- वसई
काळू पडलिया- कांदिवली पूर्व
यशवंत सी- चारकोप
गणेश यादव- सायन
हेमंत ओघळे- श्रीरामपूर
अभयकुमार साळुंखे- निलंगा
गणपतराव पाटील- शिरोळ
महेश गंगाने- अकोट
ही होती काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress 1st Candidates List)
के. सी. पाडवी : अक्कलकुवा
राजेंद्र गावीत : शहादा
किरण तडवी : नंदूरबार
श्रीक्रिशकुमार नाईक : नवापूर
प्रवीण चौरे : साक्री
कुणाल पाटील : धुळे ग्रामीण
धनंजय चौधरी : रावेर
राजेश एकडे : मलकापूर
राहुल बोंडरे : चिखली
अमित झनक : रिसोड
विरेंद्र जगताप : धामणगाव रेल्वे
सुनील देशमुख : अमरावती
यशोमती ठाकूर : तिवसा
अनिरूद्ध देशमुख : अचलपूर
रंजित कांबळे : देवळी
प्रफुल गुडाधे : नागपूर दक्षिण पश्चिम
बंटी शेळके : नागपूर मध्य
विकास ठाकरे : नागपूर पश्चिम
नितीन राऊत : नागपूर उत्तर
नाना पटोले : साकोली
गोपालदास अग्रवाल : गोंदीया
सुभाष धोते : राजूरा
विजय वड्डेटीवार : ब्रम्हपूरी
सतीश वारजूकर : चिमूर
माधवराव पाटील: हदगाव
तिरूपती कोंडेकर : भोकर
मीनल पाटील: नायगाव
सुरेश वरपुडकर: पाथरी
विलास औताडे : फुलंब्री
सय्यद हूसेन : मिरा भाईंदर
अस्लम शेख : मालाड पश्चिम
आरीफ खान : चांदीवली
ज्योती गायकवाड : धारावी
अमिन पटेल : मुंबादेवी
संजय जगताप : पूरंदर
संग्राम थोपटे : भोर
रविंद्र धंगेकर : कसबा पेठ
विजय थोरात : संगमनेर
प्रभावती घोगरे : शिर्डी
धीरज देशमुख : लातूर ग्रामीण
अमित देशमुख : लातूर शहर
सिद्धाराम म्हेत्रे : अक्कलकोट
पृथ्वीराज चव्हाण : कराड दक्षिण
ऋतुराज पाटील : कोल्हापूर दक्षिण
राहुल पाटील : करवीर
राजू आवळे : हातकणंगले
डॉ.विश्वजीत पतंगराव कदम : पलूस-कडेगाव
विक्रमसिंह सावंत : जत
काँग्रेसने 2019 विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवलेल्या?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होती. त्यामुळे काँग्रेसने राज्यात 147 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 121 जागा लढवल्या होत्या. त्याआधी म्हणजे 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती तुटली होती. त्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या.
Congress Candidates 2nd List: Congress 2nd list is out, new politics in MVA?
Maharashtra Vidhansabha Election 2024 Congress 2nd List of Candidates: