MEDIA VNI
विधानसभा निवडणूक करिता 22 ऑक्टोंबर पासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू.!मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. त्यानूसार गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या तीनही विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूकीची अधीसुचना दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 22 ऑक्टोबर ते दिनाक 29 ऑक्टोबर 2024 (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत निवडणूकीचे नामनिर्देशनपत्र संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात स्विकारण्यात येतील. तसेच दिनांक 30 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 11.00 वाजता नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी दिनांक 04 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंतची मुदत असून, दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 पर्यंत मतदान घेण्यात येईल. मतमोजनी दिनांक 23 नोव्हेंबर 2024 ला होईल.
वरीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे संबंधीत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
Nominations will be accepted from October 22 for the assembly elections. Nomination process for assembly election starts from October 22.