दि. 21 ऑक्टोंबर 2024
भाजपाकडून कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : भाजपाने राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्या उमेदवारात ८० उमेदवार हे विद्यमान आमदार आहेत. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गजबे आता तिसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र सर्वांच्या नजरा लागून असलेल्या गडचिरोली विधानसभेची उमेदवारी अद्याप ‘गुलदस्यात असून भाजपा विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांना तिसऱ्यांदा संधी देणार की अन्य कुणाला उमेदवारी देणार याकडे मतदारांसह भाजपा कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
Krishna Gajbe nominated for the third time from BJP. #आरमोरी #Armori
Armori Assembly Constituency
#विधानसभा #vidhansabha