आरमोरी - गडचिरोली - अहेरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निकाल जाहिर.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

आरमोरी - गडचिरोली - अहेरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निकाल जाहिर.!

दि. 23 नोव्हेंबर 2024 
MEDIA VNI 
आरमोरी - गडचिरोली - अहेरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निकाल जाहिर.! 
- आरमोरीतून काँग्रेसचे रामदास मळूजी मसराम, गडचिरोलीतून भारतीय जनता पार्टीचे डॉ. मिलींद रामजी नरोटे आणि अहेरी विधानसभा मतदार संघातून नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टीचे धर्मरावबाबा आत्राम विजयी.! 
मीडिया वी.एन.आय :  
गडचिरोली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात 67-आरमोरी विधानसभा मतदारसंघातून इंडियन नॅशनल काँग्रेसचे रामदास मळूजी मसराम, 68-गडचिरोली विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे डॉ. मिलींद रामजी नरोटे आणि 69-अहेरी विधानसभा मतदार संघातून नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टीचे धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले आहेत. त्यांना संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी, राहूल मीना व कुशल जैन यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात 67-आरमोरी मतदारसंघातून 8, 68-गडचिरोलीतून 9 आणि 69-अहेरीतून 12 असे एकूण 29 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज करण्यात आली असून निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यानुसार उमेदवारांना मिळालेली एकूण मते पुढीलप्रमाणे आहेत.
67-आरमोरी विधानसभा मतदार संघ: रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस ( 98509 ), कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी ( 92299 ), आनंदराव गंगाराम गेडाम-अपक्ष(1954 ), डॉ. शिलू चिमुरकर पेंदाम - अपक्ष( 854 ), मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी(1808 ), चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी (कांशीराम) (1927 ), अनिल तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी(3438 ),खेमराज वातूजी नेवारे- अपक्ष( 745 ), नोटा-1762.
68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ: डॉ. मिलींद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी( 116540),मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस(101035), संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी(3241), जयश्री विजय वेळदा- पीजेंट्स ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया( 3362 ), भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी(1852), योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना गणतंत्र पार्टी(480), दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष(673 ), बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष( 768 ), डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष (1552), नोटा-2817.
69- अहेरी विधानसभा मतदार संघ: आत्राम धरमरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी( 54206 ), राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष( 37392 ), आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ( 35765 ), हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष(27188 ), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी (2674 ) संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना( 2993 ), निता पेंटाजी तलांडी- प्रहार जनशक्ती पार्टी( 1214 ), आत्राम दिपक मल्लाजी- अपक्ष(6606 ), कुमरम महेश जयराम- अपक्ष(1112 ), गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष(1339 ), नितीन कविश्वर पदा- अपक्ष( 5648 ), लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष( 3902 ), नोटा-5825. 
Armori - Gadchiroli - Aheri Assembly General Election Results Announced!

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->