MEDIA VNI
विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पर्लकोटा नदी पुलावरील पेरून ठेवलेली स्फोटके केली नष्ट.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर माओवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके (I.E.D)पेरून ठेवल्याची विश्वसनीय गोपनिय माहिती मिळाली होती.त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या विश्वसनिय गोपनिय माहितीच्या आधारे सदर स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करणेकामी गडचिरोलीहून एक (BDDS)बीडीडीएस टीम हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आली. गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ कंपनी आणि बीएसएफ कंपनीच्या एकत्रित पथकाने सदर परिसरात शोध अभियान सुरू केले. शोध अभियाना दरम्यान पथकांना भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन स्फोटके (IED)सापडले. बीडीडीएस पथक स्फोटके निष्क्रिय करण्याची तयारी करत असताना एका स्फोटकाचा (IED)स्फोट झाला, तर दुसरे स्फोटक (IED) बीडीडीएस पथकाने घटनास्थ्ळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केला.
सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही, तसेच सदर परिसरात अजून शोध अभियान सुरू आहे. गडचिरोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे.
गृहमंत्र्यांचा इशारा अन् स्फोटाच्या योगायोगाची चर्चा
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी १५ नोव्हेंबरला चंद्रपूरच्या सभेत गडचिरोलीतील नक्षलवाद संपुष्टात आला. ३१ मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडमधील नक्षलवाद संपवू अशी घोषणा केली. या घोषणेनंतर काही तासांतच भामरागडमधून स्फोटाची बातमी आली. त्यामुळे गृहिमंत्र्यांचा नक्षल्यांना इशारा अन् स्फोटाची घटना या योगायोगाची चर्चा होत आहे.
स्फोट घडल्याची खात्री केली आहे. त्यात तथ्य आहे. या स्फोटाबद्दल अधिक चौकशी सुरु आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
- नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली
Explosives planted on Pearlkota river bridge were destroyed in the background of assembly elections. #Gadchiroli #गडचिरोली #gadchirolipolice #election