देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाची निमंत्रण पत्रिका व्हायरल; बघा.. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाची निमंत्रण पत्रिका व्हायरल; बघा..

दि. 05 डिसेंबर 2024
MEDIA VNI 
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाची निमंत्रण पत्रिका व्हायरल; बघा..
Devendra Fadnavis Oath Ceremony Invitation Card Viral : 
मीडिया वी.एन.आय : 
मुबंई : नव्या सरकार स्थापनेसाठी (4 डिसेंबर) मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. भाजपाची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वाची बैठक झाली.
त्यानंतर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड केली. यानंतर आता राज्यपालांकडे महायुतीतर्फे सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. मात्र, अद्याप राज्यपालांकडे कोणत्याही पक्षाने / आघाडीने बहुमताचा दावा करण्यापूर्वीच फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेली आमंत्रण पत्रिका व्हायरल होत आहे.

महायुतीचं ठरलं! शिंदेंना नगरविकास खाते फिक्स, अजित पवारांचं काय?

व्हायरल होणाऱ्या पत्रिकेत नेमकं काय?

व्हायरल होणाऱ्या पत्रिकेत सर्वात वरच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख असून, श्री. नरेंद्र मोदी मा. पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीसयांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तसेच उप मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ गुरुवार, दिनांक ५ डिसेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजता आझाद मैदान, फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी आपण कृपया उपस्थित रहावे, ही विनंती. असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या नावाचाही उल्लेख आहे.
शिवाय उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींसाठी यात काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. ज्यात (१) ही निमंत्रणपत्रिका केवळ एका व्यक्तीकरिता असून, समारंभस्थळी गेट क्रमांक ७ (महात्मा गांधी मार्ग) येथे प्रवेशासाठी ही निमंत्रणपत्रिका कृपया दाखवावी. सुरक्षेच्या दृष्टीने सायंकाळी ४-३० पर्यंत आसनस्थ होणे अनिवार्य असून, कृपया भ्रमणध्वनी व्यतिरिक्त कोणतीही वस्तू सोबत आणू नये असा उल्लेख आहे.

नितेश राणे, पंकजा मुंडेंसह अनेक दिग्गज घेणार शपथ?; खाते वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला!

राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो - देवेंद्र फडणवीस

भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड करण्यात आली. त्यानंतर फडणवीसांनी विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो असे म्हणत यावेळची निवडणूक ही अतिशय ऐतिहासिक होती. या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी म्हणेन या निवडणुकीने एक गोष्ट ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है. मोदींच्या नेतृत्वात देशात विजयाची मालिका लोकसभेनंतर हरियाणापासून सुरू झाली. महाराष्ट्राने जो कौल दिला आहे. खरं म्हणजे राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो. अशा भावना फडणवीसांनी गट नेतेपदी निवड झाल्यानंतर व्यक्त केल्या. 
Devendra Fadnavis's oath-taking ceremony invitation card goes viral; Look..

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->