दि. 04 नोव्हेंबर 2024
जंगली हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा; - गडचिरोली जिल्हा काँग्रेस पक्षाची मागणी.! - आर्थिक नुकसान भरपाईत 1 लक्ष रूपये पर्यंतची वाढ करा - आमदार रामदास मसराम.!
- जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदास मसराम, सह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मुख्य वनसंरक्षक यांच्यासोबत बैठक व चर्चा.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली जिल्हातील बहुसंख्य नागरिकांचे उदरनिर्वाह हे शेतीवर अवलंबून आहे. मात्र जिल्ह्यात मागील २-३ वर्षापासून परराज्यातून आलेल्या जंगली हत्तीने धुमाकूळ घातली आहे.
जंगली हत्तीचा कायस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा म्हणून जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने वारंवार निवेदन व विविध आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करून देखील अजूनपर्यंत यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, या वर्षी शेती हंगामाचे पिक निघालेले असतांना जंगली हत्तीने जिल्ह्यात परत धुमाकूळ घातलेली आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झालेला असून, तातडीने जंगली हत्तीचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा या मागणीला घेऊन, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष परसराम टिकले, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, शिवाजी नरोटे सह इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांची भेट घेऊन रानटी हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासंदर्भात चर्चा केली. सोबतच नुकसान भरपाईत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत ५० हजाराहून १ लक्ष रुपये पर्यंतची वाढ करण्याची मागणी आमदार रामदास मसराम यांनी केली आहे. या संदर्भात विधानभवनातही आवाज उचलणार असल्याचे आमदार रामदास मसराम यांनी सांगितले आहे.
Manage wild elephants; - Demand of Gadchiroli District Congress Party
- Increase the financial compensation up to 1 lakh rupees - MLA Ramdas Masram.!