लॉयड्स मेटल्स कंपनीतर्फे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात साजरी.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

लॉयड्स मेटल्स कंपनीतर्फे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात साजरी.!

दि. 04 डिसेंबर 2024 
MEDIA VNI 
लॉयड्स मेटल्स कंपनीतर्फे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात साजरी.!
मीडिया वी.एन.आय :  
गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी लोहखान, सुरजागडच्या वतीने हेडरी येथे 1 डिसेंबर रोजी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडकडून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करणे ही एक उत्कृष्ट कल्पना आहे.
स्पर्धेचा उद्देश कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबांमध्ये आरोग्य जागरूकता वाढविणे, युवकांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण करण्याचा आहे. या स्पर्धेमध्ये सर्वानी सहभाग घेवून आपले आरोग्य सुधृढ राहण्यासाठी प्रयत्न करावे, असे मत डॉ. खुणे यांनी यावेळी व्यक्त केले. व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मिनी मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरजागडसारखा मोठा लोहप्रकल्प उभारून बेरोजगारांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि. चे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण यांचे आभार मानले.
सदर मिनी मॅरेथॉन वयाच्या गटानुसार घेण्यात आल्याने 18 ते 55 या वयोगटातील कंपनीच्या सर्व महिला-पुरुष अशा 1300 कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. मीनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना स्पर्धेच्या निमित्ताने एक टी-शर्टचे वितरण केल्यानंतर सर्वानी गटानुसार टी-शर्ट घालून स्पर्धेत सहभाग नोंदविला. सदर मॅरेथॉन स्पर्धा सिएसआर कॉम्प्लेक्स हेडरीपासून लोहखान सुरजागड कंपनीपर्यंत 5 किमी अंतरात घेण्यात आली. सहभाग घेणार्‍या स्पर्धकांना मॅरेथॉन मार्गावर ग्लुकोज, फळ देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुरसलगोंदीच्या सरपंच अरुणाताई सडमेक, उपसरपंच राकेश कवडो, तोडसाच्या वनिता कोरामी, नागुलवाडीचे सरपंच नेवलु पाटील गावडे, ग्रामपंचायत सदस्य विनोद नरोटे, सी. कुमरेसन, एस. व्यंकटेश्‍वरण, साई कुमार, भोलू सोमनानी, संजय चांगलानी यांच्या उपस्थितीत विजेत्यांना शिल्ड, मेडल, बक्षीस देवून गौरविण्यात आले. सोबतच याप्रसंगी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीमध्ये 27 वर्ष सेवा देणारे के. सत्याराव यांचा सेवानिवृत्तीपर शॉल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान बी. प्रभाकरन यांनी म्हटले की, आज लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडकडून झालेल्या आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत आपल्या कंपणीचे सर्व महिला-पुरुष कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला, ही गौरवाची बाब आहे. यापुढे स्थानिक समुदायात सकारात्मकता, जोश, उत्साह आणण्याकरिता नेहमी अशा स्पर्धेचे आयोजन करीत या भागातील युवक-युवतीकरीता एक उत्तम प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे ते सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन सौरव वालीया यांनी तर आभार जानव्ही शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व कर्मचार्‍यांनी सहभाग घेवून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
Lloyds Metals Company celebrated mini marathon competition with enthusiasm.
#गडचिरोली #Gadchiroli #GadchiroliNews 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->