- आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्याची काँग्रेसची मागणी.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल फक्त काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीसाठीच नाही तर राज्यातील जनतेसाठी धक्कादायक, अविश्वसनीय व अकल्पनीय आहेत. कोणतीही लाट नसतांना पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या एकदम उलट कसे काय लागू शकतात असा प्रश्न राजकीय नेते कार्यकर्ते यांच्यासह पत्रकार, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनाही पडला आहे.
निवडणूक आयोगाने मतदानच्या दिवशी 3 वाजता मतदान प्रक्रिया पार पडल्या नंत्तर सायंकाळी 5 वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीत गडचिरोली विधानसभा 69.22% तर आरमोरी विधानसभेत 71.26% इतके मतदान झाले आणि अंतिम मतदानामध्ये गडचिरोली विधानसभेत 74.92% तर आरमोरी विधानसभेत 76.97% इतके मतदान झाल्याचे सांगितले, या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार असून संपूर्ण महाराष्ट्रात देखील अश्याच पद्धतीने मतांच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. यामुळे EVM संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात यावे यासाठी काँग्रेसची प्रमुख मागणी असून, काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे, व त्या स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त यांना देण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या सह, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनियुक्त आमदार रामदास मसराम, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, महिला अध्यक्ष ऍड. कविताताई मोहरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेस नेते शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, अब्दुल पंजवानी, नितेश राठोड, सुनील चडगुलवार, राजेश ठाकूर, रमेश चौधरी, मिलिंद खोब्रागडे, नंदू वाईलकर, दत्तात्र्यय खरवडे, उत्तम ठाकरे, सुरेश भांडेकर, अनिल कोठारे,रवींद्र पाल, जितेंद्र मुनघाटे, कल्पना नंदेश्वर, हेमंत मोहितकर, रिता गोवर्धन, गौरव आलाम, गौरव येणप्रड्डीवार, विपुल येलट्टीवार, सुशील शहा, शालिक पत्रे, विजय लाड, सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Congress will conduct signature campaign against EVM.
- Congress demands that the upcoming elections be held on ballot paper only.